नेवासा बसस्थानकात पाकिटमार महिलांवर पोलिसांची कारवाई

नेवासा बसस्थानकात पाकिटमार महिलांवर पोलिसांची कारवाई

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

गेल्या अनेक महिन्यापासून नेवासा बसस्थानकात गोरगरीब प्रवाशी नागरिकांचा खिसा मारणार्‍या

काही महिलांना काल पोलीस निरीक्षक यांनी रंगेहात पकडून चांगली चपराक दिली. करे यांच्या या कारवाईचे प्रवाशी वर्गातून स्वागत केले जात आहे.

नेवासा बसस्थनाक येथे प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. अनेक प्रवाशांना नेहमीच घाई गडबड असते याच गोष्टीचा फायदा काही पाकिटमार घेतात आणि गोरगरिब नागरिकांचा खिसा मारतात.

पोलीस निरीक्षक विजय करे यांनी गोपनीय माहिती वरून बस (एमएच 20 बी 1690) गंगापूर-नेवासा या बसमधील पाच ते सहा महिला पाकिटमार यांना पकडले आणि सरळ पोलीस ठाण्यात नेले व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली.

यापुढे शहरात, बँक, शाळा, मार्केट, बस स्थानक परिसरात बिट मार्शल नेमणुक करून अशा प्रकारे होणार्‍या चोर्‍यांना आळा घालण्याचे काम करणार असल्याचे पोलीस निरीक्षक विजय करे यांनी स्पष्ट केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com