
नेवासा |बुद्रुक वार्ताहर| Newasa
नेवासा आगारातील (Newasa Bus Stand) नगर-नेवासा हि बस (Nagar Newasa Bus) सकाळी दोनदा दे धक्का मारून चालु करावी लागली. भर उन्हात देखील ही बस प्रवाशी व कर्मचारी यांनी धक्का देऊन सुरू केली.
यानंतर सायंकाळी देखील एसटी कर्मचारी व प्रवाशी यांनी ह्या बसला धक्का मारून चालु केली. त्यामुळे बस स्थानकात मोठी चर्चा या बसची पहावयास मिळाली.