
नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa
बोअवेलची गाडी (Borewell Vehicle) तामिळनाडू (Tamilnadu) येथील चालकाने नेवासाफाटा येथून 4 वर्षापूर्वी चोरुन (Theft) नेली होती. या बोअवेलच्या गाडीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले असून पोलिसांनी 35 लाखाची ही गाडी जप्त (Seized) करुन नेवासा (Newasa) येथे आणली आहे.
याबाबत विष्णू श्रीरंग निपुंगे यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, त्यांचे मालकीची पस्तीस लाख रुपये किंमतीची बोअवेलची गाडी (Borewell Vehicle) (केए 01 एमएफ 1516) चालक मुरुगेशन गोविंदन (रा. अत्तूर जि. सलाम राज्य तामिळनाडू) याने सन 2019 मध्ये त्यांना न सांगता चोरुन घेवून गेलेला होता अशी फिर्याद दिली होती. संबंधित चालकावर गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आलेला आहे.
वरिष्ठांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे यांनी पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे, उपनिरीक्षक मनोज मोंढे, कॉन्स्टेबल शाम गुंजाळ, सुमित करंजकर, राम वैद्य असे पथक नेमले होते. त्यांनी वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे तामिळनाडू (Tamilnadu) येथे जावून चोरीस गेलेल्या बोअवेलच्या गाडीचा (Borewell Vehicle) शोध घेवून सदरची गाडी जप्त (Seized) करुन तीला पुन्हा नेवासा (Newasa) येथे आणले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे करीत आहेत.