नेवासाफाटा व भानसहिवरेतील चार मटका अड्ड्यांवर छापे
सार्वमत

नेवासाफाटा व भानसहिवरेतील चार मटका अड्ड्यांवर छापे

नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पथकाची कारवाई; सहा जणांवर गुन्हे दाखल

Arvind Arkhade

नेवासा|तालुका वार्ताहर|Newasa

नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नगरच्या स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस पथकाने नेवासाफाटा व भानसहिवरा येथील एकूण 4 मटका अड्ड्यांवर छापे टाकून 6 जणांवर गुन्हे दाखल करुन कारवाई केली.

याबाबत माहिती अशी की, नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मंगळवार दि. 7 जुलै रोजी दुपारी नेवासाफाटा व भानसहिवरा येथे छापे टाकले यातील तीन छाप्यात तिघांवर तर एका छाप्यात तिघांवर असे 4 छाप्यात 6 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

दुपारी 3 वाजता भानसहिवरा येथे छापा टाकण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल सागर अशोक ससाणे यांनी याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. भानसहिवरा येथील बसस्टॅण्ड परिसरात दुपारी 3 वाजेच्या सुलमारास टपरीच्या आडोशाला आदिनाथ रामभाऊ पवार (वय 42) रा. भानसहिवरा ता. नेवासा हा विनापरवाना बेकायदा लोकांकडून चिठ्ठ्यांवर आकडे घेवून कल्याण मटका नावाचा जुगार खेळताना मिळून आला. त्याच्याकडून रोख 850 रुपये व मटक्याचे साहित्य जप्त करण्यात आले.

दुसरा छापा याच भानसहिवरा बसस्टॅण्ड परिसरात दुपारी साडेतीन वाजता टाकण्यात आला. याबबात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल विनोद शिवाजी मासाळकर यांनी फिर्याद दिली असून त्यावरुन दिगंबर विजय गुजर (वय 28) रा. भानसहिवरा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडून 750रुपये रोख व 5 हजार रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा 5 हजार 750 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तिसरा छापा नेवासा फाटा येथे दुपारी 4 वाजता टाकण्यात आला. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस नाईक ज्ञानेश्वर नामदेव शिंदे यांनी याबाबत फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, नेवासाफाटा येथे टपरीच्या आडोशाला दत्तात्र अमृत दिघे (वय 29) हा कल्याण मटका जुगार खेळताना व खेळविताना मिळून आला. त्याच्याकडून रोख 930 रुपये रक्कम जप्त करण्यात आली.

चौथा छापा दुपारी साडेचार वाजता नेवासाफाटा येथील हॉटेल अभिषेकसमोर टपरीच्या आडोशाला टाकण्यात आला. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक ज्ञानेश्वर नामदेव शिंदे यांनी फिर्याद दिली असून त्यावरुन संजय पंढरीनाथ गाडेकर (वय 50) रा. नेवासाफाटा, बाळासाहेब बाबुराव जोंधळे (वय 50) रा. मध्यमेश्वरनगर, नेवासा खुर्द तसेच किशोर रामभाऊ तट्टू रा. नेवासा बुद्रुक या तिघांवर गुन्हा दाखल करण्याता आला आहे.

फिर्यादीत म्हटले की, नेवासाफाटा येथील हॉटेल अभिषेकच्या समोर लोकांना चिठ्ठ्यांर आकडे घेवून पैसे देताना बाळासाहेब जोंधळे व संजय गाडेकर मिळून आले. हा खेळ कोणासाठी घेता? असे विचारले असता त्यांनी किशोर रामभाऊ तट्टू रा. नेवासा बुद्रुक असे नाव सांगितले. संजय पंढरीनाथ गाडेकर याचेकडून 8 हजार रुपये किंमतीचा मोबाईल व 430 रुपये रोख रक्कम तर बाळासाहेब बाबुराव जोंधळे याच्याकडून 500 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. या दोघांसह किशोर रामभाऊ तट्टू याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. किशोर तट्टू यास फरार दाखविण्यात आले.

वरील तिनही छाप्यांच्या प्रकरणातील सहाही आरोपींवर मुंबई जुगार कायदा कलम 12(अ) नुसार कारवाई करण्यात आली.

Deshdoot
www.deshdoot.com