व्हायरल ध्वनिफीत प्रकरणी कारवाई करा; व्यापारी असोसिएशनचा उद्या बंद

व्हायरल ध्वनिफीत प्रकरणी कारवाई करा; व्यापारी असोसिएशनचा उद्या बंद

नेवासा | शहर प्रतिनीधी

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Minister Shankarrao Gadakh) व त्यांचे सुपुत्र उदयन गडाख (Udayan Gadakh) यांना जिवे मारण्याच्या कटाचा संवाद असलेली ध्वनीफित व्हायरल झाली. यातील गुन्हेगारांना अटक होऊन कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी तालुका व्यापारी संघटना व नामदार शंकरराव गडाख मित्र मंडळाच्या वतीने तहसीलदार रुपेशकुमार सुराणा व पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी भाऊसाहेब वाघ व इम्रान दारुवाला यांनी हा प्रकार गंभीर असुन त्वरित कारवाई न केल्यास तालुक्यात मोठे जन आंदोलन उभे करण्यात येईल यांची नोंद प्रशासनाने घ्यावी अशा संतप्त भावना व्यक्त केल्या.

व्हायरल ध्वनिफीत प्रकरणी कारवाई करा; व्यापारी असोसिएशनचा उद्या बंद
'शहनाज गिल'चा किलर लूक, फोटोंवरुन हटणार नाही नजर!

निवेदनावर माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, पंचायत समिती उपसभापती किशोर जोजार, उपनगराध्यक्ष लक्ष्मण जगताप, प्रकाश सोनटक्के, नारायण लोखंडे, अभिजित मापारी, राजेंद्र उंदरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान कट रचण्याच्या घटनेचा निषेध व दोषींवर कारवाई करण्यात यावी यासाठी लवकरच नेवासा तालुका व्यापारी असोसिएशनच्या वतीने उद्या बंद पाळण्यात येणार आहे.

व्हायरल ध्वनिफीत प्रकरणी कारवाई करा; व्यापारी असोसिएशनचा उद्या बंद
पांढरी साडी अन् साधा भोळा अंदाज, पाहा 'आर्ची'चे खास फोटो

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com