इटलीच्या पाहुण्याचे बाभूळखेडेत कुतूहल

इटलीच्या पाहुण्याचे बाभूळखेडेत कुतूहल

नेवासा | तालुका प्रतिनिधी

नेवासा (Newasa) तालुक्यातील बाभुळखेडे (Babhulkhede) ह्या छोट्याशा खेडे गावी इटलीचे (Italy) वॉल्टर बरेसल (Walter Baresal) यांनी दादासाहेब कडू (Dadasaheb Kadu) यांच्या घरी भेट दिली.

तालुक्यातील बाभुळखेडे (Babhulkhede) येथील कडू कुटुंबीय गेली अनेक वर्षे झाली नैसर्गिक शेती करत आहे. या बाबीची माहिती पुण्यातील एका व्यापाऱ्याने वॉल्टर बरसेल यांना सांगितली असता निसर्ग शेती व गोपालन याची सांगड भारतातील शेतकरी प्रत्यक्षात कशा पद्धतीने घालतात याचा अभ्यास करण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने इटलीमधील शेती विषयावर अभ्यास करणारे वॉल्टर यांची नेमणूक केलेली आहे.

ते सध्या नैसर्गिक शेती तज्ञ म्हणून काम पाहत असल्याचे त्यांनी सांगितले. भारतातील संस्कृती ही सर्वश्रेष्ठ संस्कृती असून तिला जगात शंभर टक्के जोड नाही असे त्यानी सांगितले. गुळाची निर्मिती करून आपल्या मातृभूमीची सेवा करत असलेले माधव गुळाचे व्यवस्थापक शिवराज कडू हे देशसेवा करतात आणि हीच देशाची सेवा आहे असे वॉल्टर म्हणाले.

दादासाहेब कडू यांनी सांगितले की, पूर्वीपासून आमचे कुटुंब गाईचे पूजन करणारे आहेत. पुढील पिढीने त्याला अत्याधुनिक पद्धतीने जगासमोर मांडुन गो-सेवे बरोबरच उत्पन्नाचे साधन देखील निर्माण केले आणि शंभर टक्के नैसर्गिक गुळ महाराष्ट्रात पोहोचविला याचा मला अभिमान वाटतो. या कामांमध्ये माझे तिन्ही मुलं आणि महिला व्यस्त असतात.

वॉल्टर यांचेशी बोलताना मुख्य अडचण होती ती म्हणजे द्विभाषिकाची गरज. त्यासाठी गावातील दत्तात्रय विधाटे व अँड.पांडुरंग औताडे यांनी ती भूमिका पार पाडली. वॉल्टर यांनी शेतीवर जाऊन प्रत्यक्षात नैसर्गिक शेती कशी पिकवली जाते याची माहिती करून घेतली. संपूर्ण गावात इटलीचा माणूस म्हणून कुतूहल निर्माण झाले होते. या भेटीप्रसंगी त्यांच्यासोबत गावातील नागरिक उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com