अंमळनेर ग्रामस्थांचा वाळु डेपोस विरोध; आमरण उपोषणाचा इशारा

अंमळनेर ग्रामस्थांचा वाळु डेपोस विरोध; आमरण उपोषणाचा इशारा

नेवासा | तालुका प्रतिनिधी

शासनाच्या वाळु डेपोला नेवासा तालुक्यातील अंमळनेर ग्रामस्थांनी विरोध केला असून अंमळनेर येथील वाळू उपशाचा निर्णय रद्द न झाल्यास तहसील कार्यालयासमोर जनावरे व मुलाबाळासह आमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे .

वाळू ही शासनाची गौण खनिज संपत्ती असतांना आम्ही आमच्या आई प्रमाणे मुळा नदी पात्रातील वाळूचे संरक्षण केलेले आहे. एक खडा ही वाळूचा तस्करी या परिसरातून आम्ही करू दिलेली नाही.

नेवासा तालुक्यात इतरत्र वाळु साठे असतांना देखील संपूर्ण नेवासा तालुक्यातून केवळ अंमळनेर शिवारातील वाळू उचलण्याचा घाट सरकारी अधिकाऱ्यांनी बांधल्यामुळे या भागातील वाळू उपशामुळे आमच्या भागातील पाणी पातळी खोलवर जाऊन या परिसरात भयंकर दुष्काळ उद्भवण्याची परिस्थिती नाकारता येत नाही.

अंमळनेर ग्रामस्थांचा वाळु डेपोस विरोध; आमरण उपोषणाचा इशारा
मुलाच्या आजारपणाला कंटाळला, बापाने उचलले टोकाचे पाऊल...जे केलं तेही हैराण करणारे...

त्यामुळे या भागातील शासनाच्या नवीन धोरणानुसार वाळू डेपोला आमचा पूर्णपणे विरोध असून आम्ही लोकशाहीच्या मार्गाने यास विरोध करणार आहोत. वाळू डेपो निर्णय रद्द न केल्यास आमची जनावरं तसेच मुला बाळासह आम्ही नेवासा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असुन वेळ प्रसंगी आत्मदहन देखील करणार असल्याचा इशारा अमळनेर ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला आहे.

अंमळनेर ग्रामस्थांचा वाळु डेपोस विरोध; आमरण उपोषणाचा इशारा
अवकाळीचा कहर सुरूच; वीज कोसळल्याने शेतकर्‍याचा मृत्यू

निवेदनावर सरपंच ज्ञानेश्वर ऐनर, सोपान सुपनर, अण्णासाहेब माकोणे, शिवाजी घावटे, शिवाजी आयनर, लक्ष्मण बोरुडे, चंद्रकांत माकोणे, एकनाथ पवार, गोरक्षनाथ सुपनर, खंडू कोळेकर, कर्णा साहेब, आनंद गावटे, नवनाथ डोईफोडे, अशोक मोरे, नानासाहेब बर्डे, माऊली पवार, हरिभाऊ बोरुडे, माऊली माकोणे, दत्तात्रय बाचकर आदींच्या सह्या आहेत.

अंमळनेर ग्रामस्थांचा वाळु डेपोस विरोध; आमरण उपोषणाचा इशारा
कारवाई करून तहसीलदार बंगल्या जवळ लावलेला वाळूचा डंपर चोरीला

अंमळनेर येथील वाळु डेपो उपशाबाबत सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेण्यात आली होती. त्या सभेत ग्रामस्थांनी सहमती दर्शवली होती. तसेच पर्यावरण हानी होणार नाही आणि भूजल पुनर्भरणावर परिणाम होणार नाही याची भूगर्भशास्त्रज्ञ व महसूल विभागाने खात्री करुनच तेथे वाळु डेपो निर्मितीचा निर्णय घेण्यात आला व त्यानुसार शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला होता, त्यानुसार वाळू डेपोस परवानगी मिळालेली आहे.

संजय बिरादार (तहसीलदार, नेवासा)

अंमळनेर ग्रामस्थांचा वाळु डेपोस विरोध; आमरण उपोषणाचा इशारा
धक्कादायक! डेअरी फार्ममध्ये भीषण स्फोट; १८ हजार गायींचा होरपळून मृत्यू

अंमळनेर येथे २०२३ मध्ये अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेण्यात आली होती. परंतु वाळु उपशाबाबत केवळ पाच टक्के लोकांनी वाळु उपसा ठरावावर सह्या केल्या होत्या. त्यानंतर १७ मार्चला २०२३ ला याबाबत पुन्हा ग्रामसभा बोलवण्यात आली होती, त्यात ९९ टक्के लोकांनी वाळु डेपो निर्मितीस विरोध केला असून तसा ग्रामसभेचा ठराव तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आला आहे.

ज्ञानेश्वर ऐनर (लोकनियुक्तसरपंच, अंमळनेर )

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com