
नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa
नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये सोमवारी कांद्याच्या आवकेत 14 हजार गोण्या घट झाली. सोमवारी 24 हजार 347 गोण्या आवक होऊन भाव 3700 रुपयांपर्यंत निघाले. उन्हाळ कांद्याच्या मोठ्या मालाला 2800 ते 3200 रुपयांपर्यंत भाव मिळाला.
मध्यम मोठ्या मालाला 2100 ते 2200 रुपये, मध्यम मालाला 1900 ते 2000 रुपये, गोल्टी कांद्याला 1200 ते 1700 रुपये, गोल्टा कांद्याला 1500 ते 1800 रुपये, जोड कांद्याला 300 ते 400 रुपये तर एक-दोन वक्कलला 3500 ते 3700 रुपयांपर्यंत भाव मिळाला. नवीन मालाला 200 ते 2500 रुपयांपर्यंत भाव मिळाला.