कांदा भावात 'इतक्या' रुपयांची वाढ

कांदा भावात 'इतक्या' रुपयांची वाढ

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Newasa Agricultural Produce Market Committee) घोडेगाव कांदा मार्केटमध्ये (Ghodegav Onion Market) काल बुधवारी कांद्याच्या (Onion) भावात सोमवारच्या तुलनेत 200 रुपयांनी वाढ झाली. काल जास्तीत जास्त 2200 रुपयांपर्यंत भाव निघाले. 67 हजार 525 गोण्या (38 हजार 475 क्विंटल) इतकी आवक (Inward) झाली.

मोठ्या मालाला 1850 ते 1900 रुपयांचा भाव मिळाला. मध्यम मोठ्या मालाल 1650 ते 1700 रुपये, मध्यम मालाला 1600 ते 1650 रुपये, गोल्टा/गोल्टी कांद्याला (Onion) 900 ते 1600 रुपये तर जोड कांद्याला (Onion) 400 ते 500 रुपये भाव मिळाला. तीन-चार वक्कलांना 2100 ते 2200 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

Related Stories

No stories found.