घोडेगावात कांदा 1800 रुपयांवर

घोडेगावात कांदा 1800 रुपयांवर

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Newasa Agricultural Produce Market Committee) घोडेगाव कांदा मार्केटमध्ये (Ghodegav Onion Market) सोमवारी कांद्याची (onion) 53 हजार 206 गोण्या (29 हजार 795 क्विंटल) इतकी आवक झाली. भाव जास्तीत जास्त 1800 रुपयांपर्यंत निघाले.

मोठ्या मालाला 1650 ते 1700 रुपयांचा भाव मिळाला. मध्यम मोठ्या मालाला 1500 ते 1600 रुपये, मध्यम मालाला 1400 ते 1500 रुपये, गोल्टा/गोल्टी कांद्याला 800 ते 1300 रुपये, जोड कांद्याला 300 ते 400 रुपये तर एक-दोन वक्कलला 1750 ते 1800 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

Related Stories

No stories found.