घोडेगावात कांदा भाव व आवकेत मोठी वाढ

घोडेगावात कांदा भाव व आवकेत मोठी वाढ

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Newasa Agricultural Produce Market Committee) घोडेगाव कांदा मार्केटमध्ये (Ghodegav Onion Market) कांद्याच्या आवकेत (Onion Inward) जवळपास 14 हजार गोण्यांनी वाढ झाली. जास्तीत जास्त भावात 300 रुपयांनी वाढ होवून भाव 3800 रुपयांपर्यंत निघाले.

काल बुधवारी 44 हजार 452 गोण्या (24 हजार 449 क्विंटल) आवक (Inward) झाली. सोमवारच्या तुलनेत ती जवळपास 14 हजार गोण्यांनी अधिक आहे. सोमवारी 30 हजार 982 गोण्या आवक (Inward) झाली होती.

कांद्याच्या (Onion) एक-दोन लॉटला 3700 ते 3800 रुपयांपर्यंत भाव मिंळाला. मोठ्या कलरपत्ती कांद्याला (Onion) 3200 ते 3500 रुपये, मिडीयम सुपर कांद्याला (Onion) 3000 ते 3200 रुपये, गोल्टा कांद्याला (Onion) 2500 ते 2700 रुपये, गोल्टी कांद्याला (Onion) 1800 ते 2500 रुपये, जोड कांद्याला 500 ते 600 रुपये तर सरासरी भाव 2500 ते 2700 रुपयांपर्यंत निघाले.

सोमवारी जास्तीत जास्त भाव 3500 रुपयांपर्यंत निघाले होते. काल बुधवारी आवक (Inward) दीडपटीने वाढूनही भावात 300 रुपयांनी वाढ झाली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com