घोडेगावात कांदा आवकेत वाढ

भावात घसरण
घोडेगावात कांदा आवकेत वाढ

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा (Newasa) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Agricultural Produce Market Committee) घोडेगाव कांदा मार्केटमध्ये (Ghodegaon Onion Market) सोमवारच्या तुलनेत कांदा आवकेत (Onion Inward) 5 हजार गोण्यांनी वाढ झाली तर जास्तीत जास्त भावात प्रतिक्विंटल 400 रुपयांनी घट झाली.

काल बुधवारी 45 हजार 59 गोण्या (25 हजार 230 क्विंटल) इतकी कांदा आवक (Onion Inward) झाली. सोमवारी 40 हजार गोण्या आवक झाली होती. मोठ्या कलर पत्ती कांद्याला (Onion) 3000 ते 3200 रुपये भाव मिळाला. मिडीयम सुपर कांद्याला (Onion) 2500 ते 2800 रुपये, गोल्टा कांद्याला (Onion) 2200 ते 2500 रुपये, गोल्टी कांद्याला 1500 ते 2000 रुपये, जोड कांद्याला 400 ते 500 रुपये भाव मिळाला. एक-दोन लॉटला 3300 ते 3400 रुपयांपर्यंत भाव मिळाला. सोमवारी काही वक्कलांना 3800 रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. त्या तुलनेत 400 रुपयांची घसरण झाली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com