घोडेगावात कांदा 2200 रुपये क्विंटल

घोडेगावात कांदा 2200 रुपये क्विंटल

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Newasa Agricultural Produce Market Committee) घोडेगाव कांदा मार्केटमध्ये (Ghodegaon Onion Market) काल कांद्याची 66 हजार 598 गोण्या आवक (Onion Inward) झाली. भाव 2200 रुपयांपर्यंत निघाले. मंगळवारच्या तुलनेत आवकेत जवळपास 23 हजार गोण्या घट झाली. सोमवारी 89 हजार गोण्या एवढ्या प्रचंड आवक झाली होती. काल एक नंबरच्या कांद्याला 1900 ते 2000 रुपये भाव मिळाला.

दोन नंबरच्या कांद्याला (Onion) 1700 ते 1900 रुपये तर तीन नंबरच्या कांद्याला 400 ते 500 रुपये भाव मिळाला. दोन-तीन वक्कलांना 2200 रुपयांपर्यंत भाव मिळाला. शनिवारी व रविवारी विकएन्ड लॉकडाऊन जाहीर (Weekend lockdown announced on Saturday and Sunday) झालेला असल्याने शनिवारचे कांदा लिलावआता बंद ठेवण्यात (Saturday's onion auction is now closed) आले आहेत. आठवड्यात केवळ दोनच दिवस लिलाव होत आहेत. करोना नियमामुळे सोमवारच्या दिवशी दुपारी चारपर्यंत आवक घेतली जात असून त्याचे लिलाव मंगळवारी केले जात आहेत.

तर बुधवारी आवक होणार्‍या कांद्याचे गुरुवारी लिलाव केले जात आहेत. शनिवारच्या लिलाव बंदमुळे सोमवारी 89 हजार गोण्या इतकी मोठी आवक झाली होती. काल गुरुवारी ती 66 हजार 598 गोण्या इतकी होती.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com