
नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa
नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Newasa Agricultural Produce Market Committee) घोडेगाव कांदा मार्केटमध्ये (Ghodegaon Onion Market) कांद्याच्या आवकेत (Onion Inward) 5 हजार गोण्यांनी वाढ झाली असून भाव 2400 रुपयांपर्यंत निघाले. काल शनिवारी कांद्याची (Onion) 52 हजार 134 गोण्या (29 हजार 195 क्विंटल) आवक झाली.
मोठ्या मालाला 2100 ते 2200 रुपयांपर्यंत भाव मिळाला. मध्यम मोठ्या मालाला 1600 ते 1800 रुपये, मध्यम मालाला 1400 ते 1600 रुपये भाव मिळाला. गोल्टा/गोल्टी कांद्याला 1200 ते 1500 रुपये प्रतिक्विंटल, जोड कांद्याला (Onion) 400 ते 500 रुपये प्रतिक्विंटल तर काही वक्कलांना 2300 ते 2400 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.