घोडेगावात कांदा 3800

घोडेगावात कांदा 3800

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Newasa Agricultural Produce Market Committee) घोडेगाव कांदा मार्केटमध्ये (Ghodegaon Onion Market) काल सोमवारी कांद्याची (Onion) 40 हजार 335 गोण्या (22 हजार 588 क्विंटल) आवक झाली असून ती शनिवारच्या तुलनेत दहा हजार गोण्याहून अधिक आहे.

भावात दोनशे रुपयांनी वाढ होऊन जास्तीत जास्त भाव 3800 रुपयांपर्यंत निघाले. मोठ्या कलम पत्ती कांद्याला (Onion) 3300 ते 3400 रुपये भाव मिळाला. मिडीयम सुपर कांद्याला 2800 ते 3000 रुपये, गोल्टा कांद्याला (Onion) 2700 ते 3100 रुपये, गोल्टी कांद्याला (Onion) 2000 ते 2500 रुपये, जोड कांद्याला (Onion) 400 ते 500 रुपये तर एकूण सरासरी भाव 2800 ते 3200 रुपयांपर्यंत निघाले. एक-दोन वक्कलला 3600 ते 3800 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com