कांदा घसरला, दर 3600 रुपयांपर्यंत

कांदा घसरला, दर 
3600 रुपयांपर्यंत

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Agricultural Produce Market Committee) घोडेगाव कांदा मार्केटमध्ये (Ghodegaon Onion Market) काल शनिवारी कांद्याच्या भावात बुधवारच्या तुलनेत 400 रुपयांनी घट झाली. शनिवारी जास्तीत जास्त 3600 रुपयांपर्यंत भाव निघाले. काल कांद्याची (Onion) 30 हजार 16 गोण्या (16 हजार 809 क्विंटल) इतकी आवक झाली.

बुधवारच्या तुलनेत ती एक हजार गोण्यांनी कमी आहे.मोठ्या कलर पत्ती कांद्याला (Onion) 3200 ते 3300 रुपये भाव मिळाला. मिडीयम सुपर कांद्याला (Onion) 3000 ते 3100 रुपये, गोल्टा कांद्याला (Onion) 2500 ते 3000 रुपये, गोल्टी कांद्याला (Onion) 2000 ते 2500 रुपये तर जोड कांद्याला (Onion) 400 ते 800 रुपये इतका भाव मिळाला. एक-दोन वक्कलला 3400 ते 3600 रुपयांपर्यंत भाव निघाला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com