नेवासा : नवीन न्यायालयीन इमारतीच्या बांधकामासाठी ३७.५७ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता

नेवासा : नवीन न्यायालयीन इमारतीच्या बांधकामासाठी ३७.५७ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता

नेवासा | तालुका प्रतिनिधी

नेवासा येथील नवीन न्यायालयीन इमारतीच्या बांधकामासाठी रु.३७.५७ कोटी रुपये इतक्या अंदाजित खर्चाच्या कामास राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.

राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाने दि.१७ नोव्हेंबर रोजी याबाबदचा शासन निर्णय जारी केला आहे. त्यात म्हंटले आहे की, नेवासा येथे नवीन न्यायालयीन इमारत बांधण्याबाबत प्रस्ताव उच्च न्यायालय, मुंबई यांचेकडून शासनास सादर करण्यात आलेला आहे. सदरहू प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. नेवासा येथे नवीन न्यायालयीन इमारतीच्या बांधकामासाठी रु.३७.५७ कोटी (सदतीस कोटी सत्तावन्न लक्ष रुपये) इतक्या अंदाजित खर्चाच्या कामास खाली नमूद केलेल्या विगतवारीनुसार या शासन निर्णयाद्वारे प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र. -- आवश्यक बाबी -- प्रशासकीय मान्यता रुपयात

१) मूळ इमारत बांधकाम-- २१ कोटी ४१ लाख ३४ हजार ६८१

२) इंधनाच्या गॅसची पाईपलाईन -- ५ लाख

३) बायो डायजेस्टर -- ५ लाख

४) रेन वॉटर हार्वेस्टींग --१५ लाख

५) सोलार प्रुफ टॉप -- १५ लाख

६) अपंगांसाठी रॅम्प -- ५ लाख

७) फर्निचर -- २ कोटी ६७ लाख ८५ हजार

८) पाणी पुरवठा व मलनिस्सारण -- १ कोटी ०७ लाख ०६ हजार ७३४

९) अंतर्गत विद्युतिकरण -- १ कोटी ०७ लाख ०६ हजार ७३४

१०) बाह्य विद्युतिकरण -- १ कोटी २८ लाख ४८ हजार ०८१

११) अग्नीशमन यंत्रणा -- २५ लाख

१२) आवार भिंत आणि गेट -- २७ लाख ५१ हजार १२०

१३) अंतर्गत रस्ते -- ३७ लाख ६० हजार

१४) ग्राऊंड डेव्हलपमेंट -- २ लाख

१५) वाहनतळ -- १० लाख

१६) संरक्षक भिंत -- ३ लाख

१७) लॅन्ड स्केपिंग -- ५ लाख

१८) माती परिक्षण व लॅन्ड सर्व्हे-- ५ लाख

१९) सी सी ड्रेन व सीडी वर्क -- ५ लाख

२०) जुनी इमारत पाडणे -- ५ लाख

२१) जमीनीखालील पाण्याची टाकी -- १५ लाख

२२) मुख्य पाणीसाठा आणि पंप हाऊस, बोअर वेल-- २५ लाख

२३) वातानुकूलीन यंत्रणा -- १५ लाख

२४) उद्वाहन -- ५० लाख

२५) एबी रुम, पंप, जनरेटर -- १० लाख

२६) बाह्य स्वच्छतागृह -- ५ लाख

२७) सीसीटीव्ही इतर तरतूदी -- ५ लाख

२८) आकस्मिक खर्च (४%) ग्रीन बिल्डींग (५%) -- ८५ लाख ६५ हजार ३८७

२९) ग्रीन बिल्डिंग (५ %) -- १ कोटी ०७ लाख ०६ हजार ७३४

३०) वस्तू व सेवा कर (१२%) -- ३ कोटी ६५ लाख ६३ हजार ०८२

३१) भाववाढ (५%) -- १ कोटी ५२ लाख ३४ हजार ६१८

एकूण रुपये--३७ कोटी ५७ लाख ६२ हजार १७१

सदर बांधकाम सुरु करण्यापूर्वी नमूना नकाशा, मांडणी नकाशा तसेच विस्तृत नकाशास वास्तुविशारदांकडून मंजूरी घेवूनच सुरु करावे लागणार आहे. सदरचे अंदाजपत्रक हे ढोबळ नमुना अंदाजपत्रक असल्याने, या कामाच्या सविस्तर अंदाजपत्रकांना तांत्रिकदृष्ट्या मान्यता देत असताना मा. मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधिश, अहमदनगर यांच्या सहमतीने तरतूदी अंतीम करण्यात याव्यात. नियोजित जागा उपभोक्ता विभागाच्या ताब्यात असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त करुन सदर कामाच्या निविदा सूचना प्रसिध्द करण्यात याव्यात. सदर कामाची निविदा काढताना प्रत्येक कामाची स्वतंत्रपणे निविदा न काढता नमूद सर्व कामांसाठी एकत्र एकच निविदा काढण्यात यावी. काम सुरु करण्यापूर्वी सर्व संबंधित स्थानिक संस्था- प्राधिकरणे यांची मान्यता घेण्यात यावी अशा अटी या शासन निर्णयात नमूद करण्यात आलेल्या आहेत.

नेवासा न्यायालयाच्या नवीन इमारत बांधकामास प्रशासकीय मंजुरी मिळणे ही तालुक्याच्या जनतेसाठी आनंदाची बाब आहे. इमारत व्हावी व त्यासाठी आर्थिक तरतूद व्हावी यासाठी तालुक्याचे आमदार व माजी मंत्री मा.शंकरराव गडाख यांचे मोठे योगदान आहे. हे सर्व श्रेय त्यांचेच आहे. वकिल संघाच्या वतीने आ.शंकरराव गडाख साहेब यांचे आभार. नवीन न्यायालयाच्या इमारतीमुळे नेवाश्याच्या वैभवात भर पडेल व पक्षकारांची मोठी सोय होईल.

बन्सी सातपुते (अध्यक्ष, नेवासा तालुका वकिल संघ)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com