अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार, एक जखमी

नेवासा तालुक्यातील घटना
अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार, एक जखमी

भेंडा | वार्ताहर

भेंडा-कुकाणा रस्त्यावर (Bhenda-Kukana Road) भेंडा बुद्रुक (Bhenda Budruk) गावानजीक मळीनाल्या (Malinala) जवळ झालेल्या रस्ता अपघातात नेवासा (Newasa) तालुक्यातील माळीचिंचोरा (Malichincora) येथील दोन तरुण गंभीर रित्या जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नगरला उपचारसाठी नेत असताना रस्त्यातच मृत्यू झाल्याची माहिती आहे.

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार, एक जखमी
१० लाखासाठी भाडेकरूनेच केला घरमालकाच्या अपहरणाचा प्रयत्न, पण...

आज दि.20 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजेच्या दरम्यान भेंडा (Bhenda Accident) येथे मळीनाल्या नजीक रस्त्याने जात असलेल्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा येथील नितीन सोमनाथ पुंड व रमेश ज्ञानदेव पुंड (वय 28 वर्षे) हे दोघे सख्खे चुलत भाऊ गंभीररित्या जखमी झाले.

108 रुग्णवाहिका (108 Ambulance) बोलावून त्यांना इतर प्रवाशांनी नेवासा फाट्यावरील रुग्णालयात (Newasa Fhata Hospital) उपचारासाठी पाठविले. जखमी पैकी नितीन नामदेव पुंड यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नगरला (Ahmednagar) रवाना करण्यात आले होते. मात्र त्याचा रस्त्यातच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com