फाईन आर्टचा विद्यार्थी प्रदीप पवारने रेखाटले 'देवगड दिंडी'चे लक्षवेधक चित्र

फाईन आर्टचा विद्यार्थी प्रदीप पवारने रेखाटले 'देवगड दिंडी'चे लक्षवेधक चित्र

नेवासा | तालुका प्रतिनिधी

तालुक्यातील वडाळा बहिरोबा (Vadala Bahiroba) येथील फाईन आर्टचा (Fine Arts) विद्यार्थी असलेल्या प्रदीप पवार (Pradip Pawar) या विद्यार्थ्यांने आपल्या कुंचल्यातून श्रीक्षेत्र देवगड (Devgad) संस्थानचे मठाधिपती महंत भास्करगीरिजी महाराज (Bhaskargiriji Maharaj) यांचे नेतृत्वाखालील शिस्तबद्ध पायी पंढरपूर (Pandharpur) दिंडी म्हणून देशभर प्रसिद्ध असलेल्या देवगड पायी दिंडीचे पांढरीपूल घाटातील मनमोहक चित्र रेखाटले आहे.

नेवासा (Newasa) तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथील प्रदीप पवार हा विद्यार्थी जगभरात प्रसिध्द असलेल्या मुंबई (Mumbai) येथील जे जे स्कुल ऑफ आर्टमध्ये (J J School of Art) तृतीय वर्षात फाईन आर्टचे शिक्षण घेत आहे. शिक्षण घेत असतांनाच त्याने चित्रकलेच्या माध्यमातून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या कुंचल्याच्या अविष्कारातून त्याने आतापर्यंत अनेक वैशिष्ट्यपूर्ण चित्र हुबेहुब रेखाटली आहेत. त्याने आज पर्यंत 150 हुन अधिक पेंटिंग्ज केल्या.

श्रीक्षेत्र देवगड संस्थानची पांढरी पूल घाट चढताना पंढरपूर पायी दिंडीचे चित्र रेखाटण्याकरिता प्रदीपला 5 दिवस लागले, 5 दिवसातील 50 तास वेळ देवून त्याने 2.5 फुट बाय 5 फुट आकाराची कलाकृती तयार केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com