नववर्षाच्या स्वागतासाठी साईमंदिर व परिसरात आकर्षक फुलांची सजावट         

नववर्षाच्या स्वागतासाठी साईमंदिर व परिसरात आकर्षक फुलांची सजावट         

शिर्डी (प्रतिनिधी)

सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागतानिमित्त बेंगलोर येथील दानशूर साईभक्त श्री. बी.ए.बसवराजा यांच्या देणगीतून साईमंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तर शनि शिंगनापुर येथील गणेश शेटे शनेश्वर डेकोरेटर्स यांच्यावतीने देणगी स्वरुपात मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. काल दिवसभरात देशविदेशातून हजारोंच्या संख्येने भाविक साईदरबारी नतमस्तक होण्यासाठी दाखल झाले असून पोलीस यंत्रणा बंदोबस्तासाठी सज्ज असल्याचे चित्र दिसून आले.

दरम्यान ३१ डिसेंबरला वर्षअखेरीस व नववर्ष प्रारंभ निमित्ताने साईंच्या पुण्यभुमीत देशविदेशातून हजोरोंच्या संख्येने भाविक नतमस्तक होण्यासाठी साईदरबारी हजेरी लावत असतात. करोनाच्या प्रतिबंधात्मक नियमावलीचे पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आदेशानुसार रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत गर्दीची धार्मिक तीर्थक्षेत्र दर्शनास बंद ठेवली आहेत. त्यामुळे ३१ डिसेंबरला साईमंदीर रात्री बंद ठेवण्यात आले असले तरी देखील रात्री १२ वाजता मंदिरा बाहेर द्वारकामाई, चावडी मारुती मंदिर परिसरात शेकडो भाविक नवीन वर्षाच्या स्वागतासाठी उपस्थित राहिले असल्याचे बोलले जात आहे. यावेळी घड्याळाचे दोन्ही काटे बरोबर १२ वर येताच द्वारकामाईत घंटा आणी शंखनाद करण्यात आला.

त्याबरोबरच शिर्डी ग्रामस्थांकडून द्वारकामाई समोरील प्रांगणात फटाक्यांची आतीषबाजी करण्यात आली. या अभुतपुर्व अशा नयनरम्य प्रसंगी साईबाबांचा आशिर्वाद घेण्यासाठी भाविकांनी आपल्या नजरा मंदीराच्या कळसाकडे वळवून बाबांकडे आशिर्वाद मागीतले असल्याचे भाविकांनी बोलून दाखवले. साई संस्थानच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुरक्षा यंत्रणा अलर्ट होती.कोव्हिड नियमांचे काटेकोर पालन करत संस्थान प्रशासनाने दर्शनरांगेत अतिशय सुरेख पद्धतीने नियोजन केले असल्याचे भक्तांनी सांगितले. यावेळी साईमंदीरावर विद्युत रोषणाई तसेच मंदिर आणी परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. चारही प्रवेशद्वाराबाहेर पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री निस्सीम साईभक्त

शिवराजसिंह चौहान दरवर्षी प्रमाणे यंदा सुद्धा नव वर्षाच्या स्वागतासाठी आणी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी साईदरबारी हजेरी लावली. शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे मुख्यमंत्री चौहान यांचे साई संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com