पारनेरच्या पाच ग्रामपंचायतींचे नव्याने आरक्षण

पारनेरच्या पाच ग्रामपंचायतींचे नव्याने आरक्षण

पारनेर (तालुका प्रतिनिधी) -

तालुक्यातील गेल्या महिन्यात सरपंचपदाचे आरक्षण सोडतीमध्ये भोयरे गांगर्डा, वडझिरे, वडगाव दर्या, वाघुंडे बुद्रुक आणि पाबळ

या 5 ग्रामपंचायतींचे नव्याने आरक्षण सोडत प्रांताधिकारी सुधाकर भोसले व तहसीलदार ज्योती देवरे यांनी शुक्रवारी (दि. 26) जाहीर केली आहे. तहसील कार्यालयाच्या दालनात भाऊसाहेब खेडेकर, प्रांताधिकारी सुधाकर भोसले व तहसीलदार ज्योती देवरे यांनी ही आरक्षण सोडत काढली आहे.

यामध्ये भोयरे गांगर्डा, वडगाव दर्या सर्वसाधारण महिलेसाठी सरपंचपद आरक्षित करण्यात आलेले आहे. तर पाबळ आणि वाघुंडे बुद्रुकसाठी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ठेवण्यात आले आहे. वडझिरे हे अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी नवीन आरक्षण सोडत काढण्यात आलेली आहे. या पाचही गावांमध्ये निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांमध्ये सरपंचपद नसल्याने ग्रामपंचायतसह प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे यासंबंधी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी मार्गदर्शन मागितले होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com