जागा देतो...वार्डनिहाय कोरोना लसीकरण केंद्र सुरू करा

विरोधी पक्षनेते संपत बारस्कर: आयुक्तांना प्रस्ताव
जागा देतो...वार्डनिहाय कोरोना लसीकरण केंद्र सुरू करा

अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिकेने वार्डनिहाय कोरोना लसीकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे केली आहे.

18 ते 45 वयोगटासाठी मोफत लस सुरू झाल्याने लसीकरण केंद्रावर गर्दी होत आहे. तेथे कोवीड नियमांचा फज्जा उडत आहे. लसीकरण केंद्राची नगर शहरातील संख्या कमी असल्याने असले प्रकार होत आहे. त्यामुळे महापालिकेने वार्डनिहाय लसीकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे केली आहे.

लसीकरण केंद्राच्या जागेसाठी अडचण असेल तर खासगी जागा देण्यासाठी आपण पुढाकार घेवू. सामाजिक संस्थाही जागा देण्यास तयार असून तसेच शाळा खोल्यांमधून केंद्र सुरू करता येणे शक्य आहे. बारस्कर यांनी पत्रात सावेडी उपनगराचा उल्लेख केला असून शहरातही वार्डनिहाय लसीकरण केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव बारस्कर यांनी आयुक्तांना दिला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com