164 ठिकाणी नवीन स्वस्त धान्य दुकान परवाने

164 ठिकाणी नवीन स्वस्त धान्य दुकान परवाने

पुरवठा शाखेने 31 जुलैपर्यंत मागवले अर्ज

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील नागरिकांना आपल्या भागात स्वस्त धान्य उपलब्ध होण्यासाठी 164 नवीन स्वस्त धान्य दुकाने दिले जाणार आहेत. ग्रामीण भागात 147 तर शहरी भागातील 17 दुकानांचा समावेश आहे. येत्या 31 जुलैपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांनी दिली.

स्वस्त धान्य दुकानांची नियमित तपासणी पुरवठा विभागाकडून केली जाते. काही दुकानांमध्ये त्रुटी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाते. दुकानात गंभीर स्वरूपाच्य त्रुटी असल्यास परवाना रद्द केला जातो. काही ठिकाणी स्वस्त धान्य दुकान चालविणार्‍या संस्थांनी राजीनामा दिला आहे. काही गावांमध्ये तसेच शहरी भागांमध्ये उपनगरांची वाढ झाल्याने नवीन स्वस्त धान्य दुकाने मंजूर करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्ह्यात सद्यस्थितीमध्ये 164 दुकानांसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

तालुका आणि गावांचे नावे याप्रमाणे अकोले- मनोहरपूर, डोगरवाडी, टिटवी, कोंदणी, भंडारदरा, सावरकुटे, आंबेवंगण, मोरवाडी, रणद बु. अगस्तीनगर, आगार, काळेवाडी, केळी कोतूळ, कोंभाळणे, कोकणवाडी, गारवाडी, गोडेवाडी, चाँदसुरज, ठाकरवाडी, ढगेवाडी, दगडवाडी, धुमाळवाडी, नवलेवाडी, नाचणठाव, निरगुडवाडी, पिसेवाडी, पोपेरेवाडी, बारववाडी, मोरी, भोजदरवाडी, यसरठाव, रेडे, शिंदे, शिवाजीनगर, शेरेवाडी, सुलतानपूर, सोमलवाडी. संगमनेर- चिंचेवाडी, वडझरी बुद्रुक, बांबळेवाडी, कणसेवाडी, वडगाव पान, कोकणेवाडी, रायते, खराडी, निमगाव टेंभी, शिरापूर, गोडसेवाडी, मेंगाळवाडी, धुपे, कुरकुंडी, बोरबन, मालेगाव पठार, माळवाडी, कुरकुटवाडी, पेमरेवाडी, शेळकेवाडी, आभाळवाडी, औरंगपूर, बाळापूर, खंदरमाळवाडी, शेडेवाडी, चौधरवाडी, खंडेरायवाडी, मोधळवाडी, आरामपूर, आजमपूर, जुनेगाव, हसनाबाद, वैदूवाडी. राहाता : पिंपळस, लोहगाव, नांदुरकी, वाळकी, चंद्रापूर, निघोज, संभाजीनगर. कोपरगाव : बाहदराबाद, शहापूर, बर्क्तपूर, हंडेवाडी. श्रीरामपूर- कडीत बु. वांगी खु. रामपूर. राहुरी- डिग्रज, गडदे आखाडा, चिंचाळे, संक्रापूर, कणगर खु., बोधेगाव, महालगाव, मोरवाडी, दरडगाव तर्फे बेलापूर, चंडकापूर, गंगापूर, अंमळनेर. नेवासे- बोरगाव, झापवाडी, सांगवी, माळेवाडी, गोयगव्हाण, गोपाळपूर, फत्तेपूर, सुरेगाव गंगा. नगरः कोळपे आखाडा, सांडवे, मजले चिंचोली, पिंपरी घुमट. पाथर्डी- सोमठाणे खु. ढाकणवाडी, पारेवाडी, माळेगाव, चेकेवाडी, हाकेवाडी. श्रीगोंदे- आनंदवाडी, बाबुर्डी, डाकेवाडी, मासाळवाडी, ढोकराई माळ, डोमाळेवाडी, चोरमलेवाडी, पर्वतवाडी, महादेववाडी (भानगाव), भिंगण, गार, भिंगण खु., पारनेर- अस्तगाव, वाघुंडे बु., पळवे बु., बहिरोबावाडी, डोंगरवाडी. वडुले, रेनवडी, मुंगशी, दरोडी, म्हसणे, शिरसुले, ढवणवाडी, गारगुंडी, वेसदरे, भोंद्रे, पिंपळगाव तुर्क. कर्जत- अंबिकानगर, रूईगव्हाण, नेटकेवाडी, नागमठाण, गोयकरवाडी. शहरी भागात संगमनेर-2, राहाता (शिर्डी), कोपरगाव- 1, श्रीरामपूर 6, राहुरी -1, पारनेर 1 आणि अहमदनगर 4 दुकानांचा समावेश आहे.

दुकानाचे निकष

ग्रामपंचायती तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, महिला बचत गट, सहकारी संस्था आणि सार्वजनिक संस्था किंवा सार्वजनिक न्यास संस्थांना दुकाने दिले जाणार आहेत. अधिक माहितीसाठी तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com