31 जुलैपर्यंत शिर्डीचे नवे विश्‍वस्त मंडळ

पालकमंत्री मुश्रीफ : पाथर्डीचे तालुका वैद्यकीय अधिकारी सक्तीच्या रजेवर
31 जुलैपर्यंत शिर्डीचे नवे विश्‍वस्त मंडळ

अहमदनगर (प्रतिनिधी)

शिर्डी देवस्थानवर (shri saibaba sansthan trust) विश्‍वस्त नियुक्त करतांना त्यांना कोणत्याही क्षेत्रातील दहा वर्षाचा अनुभव असावा असे निर्देश न्यायालयाने (Court) दिलेले आहेत. दहा ऐवजी पाच वर्षांचा अनुभव असावा असे सरकारचे प्रयत्न आहेत. त्यासाठी कार्यवाही सुरु असुन 31 जुर्लपर्यंत विश्‍वस्त मंडळ (Board of Trustees) नियुक्त करण्यात येईल असे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Guardian Minister Hassan Mushrif) यांनी सांगितले.

दरम्यान, करंजी प्राथमिक आरोग्य केंद्रातील (Karanji Primary Health Center) डॉ. गणेश शेळके आत्महत्या प्रकरणी (Dr Ganesh Shelke suicide case) तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान दराडे (Dr Bhagwan Darade) यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले असून त्यांची चौकशी झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. जिल्ह्यातील विविध प्रश्‍नांवर आढावा बैठक घेण्यासाठी पालकमंत्री नगरमध्ये आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देतांना ते बोलत होते. तत्पूर्वी पालकमंत्र्यांनी अधिकार्‍यांसमवेत आढावा बैठक घेतली. यावेळी आ. संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap), जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (Collector Dr Rajendra Bhosale), जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले (ZP President Rajshri Ghule), मुख्य कार्यकारी अधिकरी राजेंद्र क्षिरसागर (CEO Chief Executive Officer Rajendra Kshirsagar), मनपा आयुक्त शंकर गोरे (Commissioner Shankar Gore) उपस्थित होते.

जिल्ह्यात 76 टक्के पेरण्या झाल्या असून तीन आठवड्यापासून पावसाचा (Rain) खंड आहे. कृषी विभागाच्या म्हणण्यानूसार येत्या आठ दिवसांत पाऊस न झाल्यास शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट आहे. मात्र, हवामान खात्याने (weather department) 11 तारखेपासून पावसाचा अंदाज दिला असून यामुळे बळीराजावरील दुबार पेरणीचे संकट टळेल, अशी अपेक्षा आहे.

विधानसभेतील भाजपच्या (BJP) गोंधळप्रकरणी पालकमंत्री मुश्रीफ यांनी टिका करतांना भाजपला सत्तेत येण्याची घाई झाल्यामुळे विधीमंडळात गोंधळ घालणे, तालिका अध्यक्षांना अपशब्द वापरणे असे प्रकार करण्यात येत आहेत. प्रतिविधानसभा हा त्यातीलच एक प्रकार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com