नेवासा : अतिमहत्वाच्या कामासाठीच पंचायत समिती कार्यालयात यावे
सार्वमत

नेवासा : अतिमहत्वाच्या कामासाठीच पंचायत समिती कार्यालयात यावे

पंचायत समिती सभापती रावसाहेब कांगुणे यांनी तालुक्यातील जनतेला आवाहन

Nilesh Jadhav

नेवासा । शहर प्रतिनिधी । Newasa

पंचायत समिती कार्यालयातील दोन कर्मचार्यांना करोना विषाणूची लागण झाल्याने कर्मचारी संख्या शंभर टक्के ऐवजी तेहतिस टक्के करण्यात आली आहे.

तरी तालुक्यातील जनतेने अतिमहत्वाचे काम असले तरच पंचायत समिती कार्यालयात यावे. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी महत्वाच्या कामासाठी कार्यालयात यावे. असे आवाहन पत्रकार परिषदेत सभापती रावसाहेब कांगुणे यांनी तालुक्यातील जनतेला केले आहे.

यावेळी उप सभापती किशोर जोजार, गटविकासाधिकारी शेखर शेलार हे उपस्थित होते. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंचायत समिती कार्यालय निर्जंतुकरण करण्यात आले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com