नेवासा (का. प्रतिनिधी) -

नेवासा तालुक्यातील 72 गावांच्या 59 ग्रामपंचायतींच्या 591 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या 2072 अर्जांची

काल तहसील कार्यालयात छाननी झाली. या छाननीत एकूण 56 अर्ज अवैध ठरले असून 2016 अर्ज वैध ठरले आहेत. अर्ज माघारी घेण्याची मुदत 4 जानेवारीपर्यंत आहे.

59 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या बुधवारच्या शेवटच्या दिवशी अर्जांचा पाऊस पडला. या दिवशी एकूण 1335 अर्ज दाखल झाल्याचे व एकूण अर्ज 2072 झाल्याची अंतिम आकडेवारी बुधवारी रात्री उशिरा निवडणूक विभागाने जाहीर केली होती. या सर्व दाखल अर्जांची काल गुरुवारी तहसील कार्यालयात तहसीलदार यांनी छाननी केली. यावेळी दाखल अर्जापैकी 30 ग्रामपंचायतीचे 56 अर्ज अवैध ठरले. 29 ग्रामपंचायतींमधील सर्व अर्ज वैध ठरले.

सर्वाधिक अर्ज दाखल झालेल्या भेंडा बुद्रुक ग्रामपंचायतीसाठीचे सर्व 124 अर्ज अवैध ठरले. सर्वाधिक 5 अर्ज सोनई ग्रामपंचायतीचे अवैध ठरले असून येथील 102 अर्ज वैध ठरले आहेत.

त्याशिवाय चांदा (2), खरवंडी (1), सलाबतपूर (1), प्रवरासंगम (3),

मंगळापूर ग्रामपंचायतीच्या 7 जागांसाठी सातच अर्ज दाखल झालेले होते. ते सर्व वैध ठरले. येथील एकाही उमेदवाराने माघार घेतली नाही तर ही ग्रामपंचायत बिनविरोध होईल.

खरवंडी येथे 15 जागांसाठी 16 उमेदवार आहेत. मात्र एका प्रभागातील 3 जागांसाठी केवळ दोनच उमेदवारी अर्ज आहेत.