नेवासा -

तालुक्यातील 72 गावांच्या 59 ग्रामपंचायतींच्या 591 जागांसाठी 15 जानेवारीला होणार्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या कालच्या

शेवटच्या पाचव्या दिवशी 58 ग्रामपंचायतींसाठी 1322 अर्ज दाखल झाले. शेवटच्या पाचव्या दिवसअखेर एकूण 2059 अर्ज दाखल झाले आहेत. शेवटचा दिवस असल्याने प्रचंड गर्दी झाली होती. सोनईत सर्वाधिक 107 अर्ज दाखल झाले आहेत.

पाचव्या दिवसअखेर दाखल एकूण अर्ज पुढीलप्रमाणे- बाभुळखेडे 41, बाभुळवेढे-उस्थळदुमाला 40, बहिरवाडी-धामोरी ग्रुप 21, बकुपिंपळगाव 21, बर्हाणपूर 29, बेल्हेकरवाडी 27, बेलपिंपळगाव 66, भालगाव 16, बोरगाव सुरेगाव 23 भेंडे बुद्रुक 21, चांदा 76, देवगाव- 47, देवसडे 27, धनगरवाडी-नारायणवाडी25, दिघी 39, गळनिंब 34, गेवराई 29, घोगरगाव 26, गोंडेगाव-म्हसले 28, गोणेगाव-इमामपूर-35, गोयगव्हाण-पिंपरीशहाली 46, जळके बुद्रुक 22, जळके खुर्द 28, जेऊर 61, कारेगाव 15, खडके 28, खलालपिंप्री-मडकी-मुरमे ग्रुप 23, खरवंडी 17, खेडलेपरमानंद 25, कुकाणा 75, लोहगाव 39, लांडेवाडी 27, मक्तापूर 30, माळेवाडी दुमाला-सुरेगाव तर्फे दहिगाव-वरखेड 39, माळेवाडी खालसा-म्हाळापूर-प्रवरासंगम ग्रुप 46, मांडेगव्हाण-मोरगव्हाण ग्रुप 28, मंगळापूर 7, म्हाळसपिंपळगाव 24, मोरयाचिंचोरे 14, नजिकचिंचोली 34, नवीन चांदगाव 13, निंभारी 18, निपानीनिमगाव 22, पाचुंदे24, पुनतगाव 22, रामडोह 35, रांजणगाव 43, सलाबतपूर 43, शिंगणापूर 40, शिंगवेतुकाई 21, सोनई 107, सुलतानपूर 29, तरवडी 34, तेलकुडगाव 46, टोका-वाशिम 38, उस्थळ खालसा 14, वाकडी 37, वांजोळी 32 वाटापूर 12. पहिल्या दिवशी एक अर्ज दाखल झाला होता. दुसर्या दिवशी 17, तिसर्या दिवशी 185, चौथ्या दिवशी 534 तर काल शेवटच्या दिवशी 1322 अर्ज दाखल झाले. अशाप्रकारे अर्ज भरण्याच्या मुदतीअखेर एकूण 2059 अर्ज दाखल झाले आहेत.