अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेडच्यावतीने कृषी उत्पन्न बाजार समिती नगर येथे हरभरा खरेदी केंद्र चालू झाले असल्याची माहिती सभापती अभिलाष घिगे यांनी दिली.

2020-21 या वर्षामध्ये आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेडच्यावतीने हरभरा खरेदी केंद्र कृषी उत्पन्न बाजार समिती नेप्ती उपबाजार आवार या ठिकाणी चालू झाले आहे. शासनाने सदर कडधान्य खरेदीचे दर जाहीर केले आहे. त्यानुसार हरभरा या शेतमालास प्रती क्विंटलसाठी रुपये 5 हजार 100 या प्रमाणे बाजारभाव निचित केलेला आहे.

शेतकर्यांनी शासकीय योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, तसेच शेतकर्यांनी आपला शेतमाल (हरभरा) वाळवून स्वच्छ करुन व 12 टक्के अद्रता असलेले आणावा. निकृष्ट दर्जाचा शेतमाल स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी, आवाहन बाजार समितीचे सभापती घिगे केले आहे.