नेप्ती, निमगावकरांकडून बिबट्याचा बंदोबस्ताची मागणी

नेप्ती, निमगावकरांकडून बिबट्याचा बंदोबस्ताची मागणी
File photo

अहमदनगर (प्रतिनिधी) - बिबट्यामुळे नगर तालुक्यातील निमगाव वाघा व नेप्ती गावात दशहत निर्माण झाली आहे. यामुळे तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याच्या मागणीचे दोन्ही गावातील ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.

यावेळी निमगाव वाघाचे ग्रामपंचयत सदस्य नाना डोंगरे, डॉ. विजय जाधव, माजी सरपंच साहेबराव बोडखे, दुध डेअरीचे चेअरमन गोकुळ जाधव, अनिल डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद जाधव, दिलावर शेख, नेप्तीचे माजी सरपंच संजय जपकर, अतुल जपकर उपस्थित होते. शहरालगत असलेल्या निमगाव वाघा येथील भगतमळा व नेप्तीच्या रानमळा भागात दोन मोठे व दोन लहान बिबट्यांचे वावर आहे.

या भागाजवळ मोठ्या प्रमाणात वस्ती असून शेतकरी दुग्ध व्यवसायासाठी बाहेर पडत असतात. तसेच जनावरांच्या चारण्यासाठी व शेतीच्या कामानिमित्त शेतात जावे लागत आहे. हे बिबटे चारा पिकांमध्ये दबा धरून बसलेले असल्याने शेतकर्‍यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com