
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नगर तालुका व भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत गावठी हातभट्टी ठिकाणांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापे टाकुन सहा जणांविरूध्द गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईदरम्यान गावठी हातभट्टीची साधने, तीन हजार 400 लीटर कच्चे रसायन, 220 लीटर तयार दारू असा एक लाख 92 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.
अशोक ईश्वर पवार, रवींद्र ईश्वर पवार (दोघे रा. खडकी), रौफ मेहबुब सय्यद, भरत माणिक पवार (दोघे रा. नेप्ती) यांच्याविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नवनाथ लक्ष्मण लोणारे (रा. कासारमळा, कापुरवाडी), एक महिला यांच्याविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
10 ते 12 फेब्रुवारी दरम्यान पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार बबन मखरे, दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, शंकर चौधरी, मच्छिंद्र बर्डे, रवींद्र घुंगासे, रोहिदास नवगिरे, भाग्यश्री भिटे व चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.