नेप्ती शिवारात तीन ठिकाणी हातभट्टीवर छापे

नेप्ती शिवारात तीन ठिकाणी हातभट्टीवर छापे

नगर तालुका पोलिसांची कारवाई

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पोलिसांनी नेप्ती (ता. नगर) शिवारात तीन ठिकाणी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापे टाकून 88 हजार रूपये किंमतीचे एक हजार 500 लीटर कच्चे रसायन व 17 हजार रूपये किंमतीची 170 लीटर दारू असा एक लाख पाच हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या पथकाने बुधवारी ही कारवाई केली. याप्रकरणी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस नाईक राहुल शिंदे, पोलीस नाईक योगेश ठाणगे व पोलीस नाईक अशोक मरकड यांनी तीन वेगवेगळ्या फिर्यादी दिल्या आहेत. सुनील बाजीराव पवार (रा. नेप्ती), मच्छिंद्र छबुराव चौघुले, ईश्वर तुळसीराम चौघुले (दोघे रा. चौघुले वस्ती, नेप्ती) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हे सर्व आरोपी पसार झाले आहेत.

नेप्ती शिवारात घराच्या आडोशाला हातभट्टी दारूची निर्मिती होत असल्याची माहिती सहायक निरीक्षक सानप यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस कर्मचारी धुमाळ, मरकड, ठाणगे, खेडकर यांना सोबत घेत तिन्ही ठिकाणी छापा टाकला असता गावठी दारू निर्मित्ती होत असल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. पोलिसांनी दारू निर्मितीचे रसायन, दारू जप्त केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com