8217 विद्यार्थ्यांनी दिली नीट'ची परीक्षा

परीक्षा सुरळीत; जिल्ह्यात 14 ठिकाणी परीक्षा केंद्र
File Photo
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

देशभरातील वैद्यकीय पद्वी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असणारी नीटची परीक्षा रविवार नगर जिल्ह्यात सुरळीत पारपडली. या परीक्षेसाठी नगर जिल्ह्यातून 8 हजार 683 विद्यार्थी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी परीक्षेसाठी 8 हजार 217 हजर होते. तर 496 विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली. नगर-औरंगाबाद रोडवरील यशश्री अ‍ॅकडचे प्राचार्य सायरस पंडीत यांनी नीटच्या परीक्षेसाठी जिल्ह्याचे समन्वयक म्हणून काम पाहिले.

एमबीबीएस, बीडीएस, बीएएसएम, बीएमएमएस अशा वैद्यकीय अभ्यासक्रमांचे प्रवेश हे नीट प्रवेश परीक्षेद्वारे होतात. ही परीक्षा इंग्रजी, मराठीसह एकूण 13 भाषांमध्ये घेण्यात आली. नगर जिल्ह्यात मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषेतून विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षेत एमसीक्यू पद्धतीने एकूण 200 प्रश्न विचारण्यात येणार असून, परीक्षेसाठी एकूण तीन तास 20 मिनिटांचा कालावधी होता.

परीक्षेसाठी नगर जिल्ह्यातून 8 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. दुपारच्या सत्रात ही परीक्षा झाली. परीक्षेसाठी नगर जिल्ह्यात 14 केंद्रे होती. यातील दहा केंद्र हे नगर शहरात होती. तर उर्वरित केंद्र ही कोपरगाव, संगमनेर, शेवगाव आणि जामखेड या ठिकाणी होते. परीक्षा सुरळीत पार पडल्याची माहिती परीक्षेचे जिल्हा समन्वयक प्राचार्य पंडित यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com