इंधन-गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचेे श्रीरामपुरात आंदोलन

इंधन-गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचेे श्रीरामपुरात आंदोलन

श्रीरामपूर (प्रतिनिधी) / Shrirampur - जगभरात इंधन व गॅस (fuel and gas) स्वस्त झालेला असताना केंद्र शासन भरमसाठ कर लादून देशातील सर्वसामान्य जनतेजची लूट करण्याचे पाप करत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक (Avinash Adik) यांनी केले. केंद्र सरकारने ही दरवाढ त्वरीत मागे घ्यावी, अन्यथा तिव्र आंदोलन करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलेंडरची वेळेवेळी झालेल्या दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. नगराध्यक्षा अनुराधा आदिक, सुरेश वाबळे, संदिप वर्पे, महेंद्र शेळके, लकी सेठी, अर्चना पानसरे, कैलास बोर्डे, सचिन पवार, योगेश जाधव, निरंजन भोसले, हर्षल दांगट आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नायब तहसीलदार दीपक गोवर्धने यांना निवेदन देण्यात आले.

अविनाश आदिक म्हणाले, देशात पेट्रोल, डिझेल इंधन दरवाढीचा उच्चांक झाला आहे. इंधनाचे दर वाढत असतानाच केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरचे दर 25 रुपयांनी वाढविले आहेत. अगोदरच सर्वसामान्य कष्टकरी जनता, मध्यमवर्गीय माणूस यांचे अतोनात हाल होत आहेत. एका बाजूला करोना महामारीमुळे लोक बेरोजगार होत आहेत. तसेच लॉकडाऊन व इतर अडचणींमुळे सर्वसामान्य माणूस मेटाकुटीस आला असून त्याचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. अशा परिस्थितीत इंधन व घरगुती गॅसची दरवाढ करून केंद्र सरकारला सर्वसामान्य जनतेचा विसर पडला आहे. केंद्र सरकारने ही दरवाढ त्वरीत मागे घेतली नाही तर तिव्र आंदोलन करावे लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

यावेळी सुनील थोरात, भागचंद औताडे, लक्ष्मण धोत्रे, गणेश ठाणगे, कलीम कुरेशी, सुरेखा कासार, दीपक कु्हाडे, राहुल बोंबले, प्रशांत खंडागळे, जयश्री जगताप, सोनल मुथा, अविनाश पवार, दादासाहेब झिंज, नगरसेवक मुक्तार शहा, प्रकाश ढोकणे, राजेंद्र पवार, दीपक चव्हाण, शोएब शेख, मुस्ताक शेख, सैफ शेख, डॉ. बबनराव आदिक, राजेंद्र पानसरे, सोहेल दारूवाला, भाऊसाहेब आदिक, अ‍ॅड. राजेंद्र बोर्डे, रईस जहागीरदार, डॉ. राजाराम जोंधळे, सागर कु्हाडे, रवी गरेला, तौफिक शेख, संतोष गरेला, सुमीत मुथा, सर्फराज पठाण, संदिप चोरगे, हंसराज आदिक, कैलास पवार, अनिरुद्ध भिंगारवाला, उदय साबळे, ऋषीकेश डावखर आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com