गॅस, इंधन दरवाढीच्या निषेधार्थ युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

गॅस, इंधन दरवाढीच्या निषेधार्थ युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

शेवगाव | शहर प्रतिनिधी

गॅस (LPG) आणि पेट्रोल-डिझेलच्या (petrol diesel) किमती गगनाला भिडत असल्यामुळे जनता त्रस्त आहे. काही शहरांत पेट्रोलच्या दरांनी शंभरी पार केल्यामुळे सामान्य वर्गातील अनेकांना खासगी वाहनाने प्रवास करणे जिकरीचे झाले आहे. गॅस सिलिंडरच्या किमतींमध्येही सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीव शेवगाव (Shevgoan) शहर व तालुका राष्ट्रवादी युवक (NCP) संघटनेच्या वतीने येथील मिरीरोडसह विविध पेट्रोलपंपावरआंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादी युवक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, तालुका कार्याध्यक्ष ताहेर पटेल, शहराध्यक्ष कमलेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या निदर्शनात केंद्र सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. यावेळी मोटारसायकल, स्कूटर आदी वाहनांना पुष्पहार घालून गांधी गिरी करण्यात आली. तसेच केक कापुन फेकू सरकारचा अनोखा निषेध नोंदविण्यात आला.

जनतेला महागाईच्या खाईत लोटणारे केंद्र सरकार चले जाओ, या सरकारचे करायचे काय? आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला. पाच वर्षापूर्वी असलेले इंधनाचे दर सध्या दुपटीने वाढले आहेत. इंधनाच्या वाढत्या दरवाढीने सर्व सामान्य वर्ग होरपळून निघाला आहे. पाच राज्याच्या निवडणुकीनंतर दररोज वाढणारे इंधनाचे दर आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुकीत भाजप धार्जिण्या केंद्र सरकारला जनतेने जाब विचारण्याची आवश्यकता राष्ट्रवादी युवक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष कोळगे यांनी यावेळी व्यक्त केली.

संतोष जाधव, नंदकिशोर मुंढे, कृष्णा पायघन, संतोष पावसे, दीपक चोपडे, कैलास तुजारे, उमर शेख, रोहन साबळे, संकेत वांढेकर, नीरज बोरुडे, अप्पा मगर, रोहित काथवटे, अमोल कराड, अभिजित आहेर, तुषार आव्हाड, दीपक कुसळकर, शरद सोनवणे आदींसह युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.