शहर राष्ट्रवादीच्या कामाचा अहवाल प्रदेशाध्यक्षांना सादर

शहर राष्ट्रवादीच्या कामाचा अहवाल प्रदेशाध्यक्षांना सादर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील राष्ट्रवादी भवन येथे रविवारी संध्याकाळी उशीरा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक पार पडली. आ. संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्याकडे केलेल्या कामाचा अहवाल सादर केला.

प्रा. विधाते यांनी शहर विधानसभा मतदार संघात आ. जगताप यांच्या माध्यमातून सुरू असलेली विकास कामांची माहिती देऊन, महापालिकेत राष्ट्रवादीचे उपमहापौर गणेश भोसले व नगरसेवकांच्या माध्यमातून नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यात येत आहेत. काही अडीअडचणी न सुटल्यास नागरिक आ. जगताप यांच्या संपर्क कार्यालयात अडचणी घेऊन आल्यास त्याचा निपटारा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

तर राष्ट्रवादीने संपूर्ण महाराष्ट्रात सुरू केलेल्या एक तास राष्ट्रवादीसाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी या उपक्रमांतर्गत महिन्याच्या दर शनिवारी प्रभागनिहाय बैठका होत असून, याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर नगरसेवकांच्या सहकार्यातून नागरिक पक्षाशी जोडले जात आहेत. एकूण 8 प्रभागांत या बैठका झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सभासद नोंदणीसाठी शहराला 500 सभासद पुस्तके देण्यात आली होती, त्यापैकी 364 सभासद पुस्तके नोंदणी करून त्याचा अहवाल विधाते यांनी सुपूर्द केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com