पवार यांच्या वाहनावर नगरमध्ये पुष्पवृष्टी
सार्वमत

पवार यांच्या वाहनावर नगरमध्ये पुष्पवृष्टी

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

देशभर करोना संसर्गाचे संकट मोठ्या प्रमाणात असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार महाराष्ट्र दौर्‍यावर आहेत. औरंगाबादहून पुण्याकडे जाताना नगरमध्ये त्यांच्या वाहनावर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.

करोना संकटाच्या काळातही 80 वर्षांचे तरुण योद्धा जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आहेत. शनिवारी दुपारी औरंगाबाद येथून पुण्याला जात असताना अहमदनगर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.

ते येणार असल्याने स्टेशन रस्त्यावर ‘देशाला दिशा देणारा 80 वर्षांचा तरुण योद्धा’ असे फलक लावण्यात आले होते. त्यांच्या वाहनांचा ताफा येताच पवार यांच्या वाहनावर पुष्पवृष्टी करण्यात आली. वाहनातूनच त्यांनी नेते, कार्यकर्त्यांचे स्वागत स्वीकारत पुण्याच्या दिशेने मार्गक्रमण केले.

महाराष्ट्रावरील संकटाला दोन हात करण्याचे काम पवार करीत आहेत. त्यांना बघून तरुण पिढीमध्ये स्फूर्ती निर्माण होत आहे. त्यांच्या या कामाला आमचा सलाम. त्यांचे समाजाबद्दल असलेले विचार युवकांसाठी प्रेरणादायी आहेत, असे आ. संग्राम जगताप म्हणाले. पवार यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते, महापालिकेतील विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, बाबासाहेब गाडाळकर, बाळासाहेब जगताप, काँग्रेसचे उबेद शेख, अभी खोसे, वैभव ढाकणे, विकी जगताप, साहेबान जहागीरदार, संतोष लांडे, लंकेश चितळकर, सागर गुंजाळ, मळू गाडळकर, वैभव वाघ, राहुल जाधव, माउली जाधव आदी उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com