शरद पवार यांची आ. लंके यांच्या निवासस्थानी भेट !

लंके कुटुंबिय, ग्रामस्थ आणि कार्यकर्ते भारावले
शरद पवार यांची आ. लंके यांच्या निवासस्थानी भेट !

पारनेर |तालुका प्रतिनिधी|Parner

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी आज (शनिवार) अचानक आमदार नीलेश लंके (MLA Nilesh Lanke) यांच्या हंगा ता.पारनेर ((Hanga Tal. Parner) येथील निवासस्थानी येत त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्या या भेटीमुळे लंके परिवाराला (MLA Lanke Family) आश्चर्याचा सुखद धक्का बसला. संपूर्ण लंके कुटुंबिय आणि हंगे ग्रामस्थ पवारांच्या भेटीने भारावून गेले. आज शनिवारी खासदार पवार (MP Sharad Pawar) नगर येथे कार्यक्रमासाठी आले होते.

कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी आमदार नीलेश लंके (MLA Nilesh Lanke) यांना आपण तुझ्या घरी जाणार आहोत' असे सांगितले. नीलेश तुझे राहणीमान साधे आहे हे दिसतेच, पण तू तुझे कुटुंबिय साध्या घरात, साध्या पध्दतीने राहता हे मी ऐकून आहे. मला आज तुझ्या आई वडिलांना, पत्नीला, मुलांना भेटायचे आहे.असे पवार यांनी आमदार लंके (MLA Nilesh Lanke) यांना सांगितले. आमदार लंके यांच्यासाठी हा सुखद धक्का होता. त्यांनी तातडीने हंगे (Hanga) येथील ग्रामस्थांशी, कार्यकर्त्यांशी संपर्क साधत खासदार पवार यांच्या स्वागताची तयारी करण्यास सांगितले. अवघ्या अर्ध्या तासात पवार (NCP President Sharad Pawar) साहेब गावात येणार हे समजल्यावर ग्रामस्थांची एकच घाई उडाली. फुलांचे आगार म्हणून हंगे गावाची ओळख आहे. त्यामुळे स्वागतासाठी पोत्यातून फुले आणण्यात आली.

गावातील सनई पथकाची जुळवा जुळव करण्यात आली. काही उत्साही कार्यकर्त्यांनी चार किलोमीटर अंतरावरील सुपे (Supa) येथून भले मोठे पुष्पहार आणले. स्वागताची जंगी तयारी करण्यात आली. खासदार पवार हंगे येथे येणार असल्याचे समजल्यावर पंचक्रोशीतील गावांमधून अनेक जण हंगे (Hanga) येथे आले. गावात मोठी गर्दी जमली. निरोप मिळाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पवारांच्या वाहनांचा ताफा हंगे येथे आला. ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. सनई चौघड्याच्या मंजूळ सुरावटीत व ढोल ताशांच्या कडकडाटात खासदार पवार यांच्यावर मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी करण्यात आली. खासदार पवार (MP Sharad Pawar) यांनी आमदार लंके (MLA Nilesh Lanke) यांच्या अत्यंत साध्या घराला भेट देत आमदार लंके यांचे वडील ज्ञानदेव लंके, आई शकुंतलाबाई, पत्नी जिल्हा परिषदेच्या सदस्या राणी लंके, बंधू दीपक यांच्याशी मनमोकळी चर्चा केली.

अगदी पाऊस पाणी, परिसरातील पीक पध्दती याविषयी शिळोप्याच्या गप्पा मारल्या. अवघ्या पंधरा मिनीटांची, परंतू लंके कुटुंबियांच्या कायमस्वरूपी स्मरणात राहील अशी कौटुंबिक भेट आटोपून खासदार पवार पुण्याकडे रवाना झाले. नीलेशच्या घरी जायचे ठरविले होते ! आमदार नीलेश लंके (MLA Nilesh Lanke) यांनी करोना संसर्गाच्याकाळात मोठे काम केले आहे. कामाच्या निमित्ताने नीलेशची वारंवार भेट होते. मात्र नीलेशचा साधेपणा पाहून एकदा त्याच्या घरी जायचे हे ठरवले होते. आज तो योग आला. आमदार लंके यांच्यासारखे साधे राहणीमान असणारे व समाजासाठी झटणारे कार्यकर्ते हीच खरी राष्ट्रवादी काँग्रेसची ओळख असल्याचे खासदार पवार (MP Sharad Pawar) यांनी लंके कुटुंबियांशी बोलताना सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com