श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

लोकसभा व राज्यसभेत बहुमत असल्याने त्यांच्या जोरावर कुठलीही चर्चा न करता केंद्रसरकारने शेतकर्यांच्या विरुध्द तीन काळे कायदे मंजूर केले आहेत.

शेतकरी अहिंसेच्या मार्गाने दिल्ली येथे गेल्या 72 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. त्यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाच्यावतीने चक्का जाम आंदोलन केले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक म्हणालेे.

यावेळी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, शहाराध्यक्ष लकी सेठी, महिलाध्यक्षा अर्चना पानसरे, योगेश जाधव, मल्लू शिंदे, सोहेल शेख, नगरसेवक राजेद्र पवार, अल्तमश पटेल, हर्षल दांगट आदी उपस्थित होते.

यावेळी अविनाश आदिक म्हणाले, गेल्या 72 दिवस देशातील शेतकरी दिल्ली सिमारेषेवर अहिंसेच्यामार्गाने अंदोलन करत आहेत. ऊन, वारा, थंडी, पाऊस, कुठलीही पर्वा न करता शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहे. केंद्र सरकार सदर आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे. केंद्रशासन व पंतप्रधान यांनी हे तीनही काळे कायदे मागे घ्यावेत. देशातील सर्व प्रमुख पक्षाच्या नेते मंडळींबरोबर चर्चा करून नवीन कायदे करावेत, असे आदिक यांनी सांगितले.

यावेळी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक म्हणाल्या, स्वर्गीय खासदार गोविंदराव आदिक यांनी महाराष्ट्र कृषक समाजाच्यावतीने 11 कलमी शेतकर्यांची सनद तत्कालीन सरकारला दिली होती त्यातील काही कलमे विचारात घ्यावी, असे सांगत त्यांनी केंद्र सरकारचा जाहीर निषेध केला आणि दिल्ली येथील आंदोलनात शहीद झालेल्या शेतकर्यांना श्रध्दांजली वाहिली.

यावेळी उत्तमराव पवार, भागचंद औताडे, चांगदेव बडे, ज्ञानदेव ढवळे, नामदेवराव राऊत, सुधाकर बोंबले, रणजीत पाटील, नंदू लबडे, राजेंद्र पानसरे, वसंतराव पवार, लक्ष्मण धोत्रे, भाऊ डाकले, ऋषिकेश डावखर, विलास ठोंबरे, सरवरअल्ली सय्यद, अरुण कवडे, विलास कवडे, दादाभाऊ कवडे, जयश्री जगताप, नलीनी कुटे,ज्योती कवडे, अनिता बोर्डे, जया पवार, रुक्साना शेख, विश्वनाथ आवटी, नवनाथ पवार, जयकार मगर, दीपक निंबाळकर, प्रशांत खंडागळे, व्हि.डी. कोळसे, राजेंद्र मोरगे, नितीन गवारे, सुनील थोरात,एकनाथ थोरात, श्रीकांत दळे, प्रकाश पाउलबुध्दे, अब्दुल पठाण, गुरुचरण भटियाणी, हंसराज आदिक, अशोक आदिक, कडु आदिक, प्रभाकर पवार, अमित हाडके, विजय खाजेकर, चंद्रकात संगम, विजय शिंदे, तोफिक शेख,गणेष ठाणगे, हेंमत चौधरी, सतीश कवडे, बाळासाहेब कवडे, गोपाल वायदेशंकर, अनंत पतंगे,शफी शहा, बाळासाहेब बोर्डे,भाऊ डाकले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.यावेळी प्रास्तविक तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे यांनी केले. आभार शहाराध्यक्ष लकी सेठी यांनी मानले.