छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुतळा बसवण्यासंदर्भात सहकार्य करण्याचे आमदार काळे यांचे आश्वासन

छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुतळा बसवण्यासंदर्भात सहकार्य करण्याचे आमदार काळे यांचे आश्वासन

राहाता | वार्ताहार

राहाता (Rahata) शहरात तहसीलच्या गोडाउनमध्ये बंदिस्त असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्याच्या संदर्भात राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे (NCP MLA Ashutosh Kale) यांनी... 

राहाता नगरपालिकेमध्ये बैठक आयोजित करून अनेक वर्षापासून बंदिस्त असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या बाबत सविस्तर माहिती पालिकेचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांच्याकडून जाणून घेतली. त्या प्रसंगी राहाता नगरपरिषदेचे उपनराध्यक्ष राजेंद्र पठारे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहरअध्यक्ष नंदकुमार सदाफळ यांनी चर्चेत सहभाग घेतला. आ.आशुतोष काळे यांनी राहाता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुतळा बसवण्यासंदर्भात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

या वेळी गौतम सहकारी बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, कोपरगाव जिनिंग व प्रोसिंग सोसायटी चे गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस रणजीत बोठे, नगरसेवक सागर लुटे, शेखर जमधडे, भागवत लांडगे, यासह आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com