आमच्याकडे फक्त शीट, बॅलेन्स विखेंकडे!

मुश्रीफांकडून चिमटे
आमच्याकडे फक्त शीट, बॅलेन्स विखेंकडे!

अहमदनगर | प्रतिनिधी

माझ्यावर टीका करणारे खा. डॉ. सुजय विखे (MP Dr Sujay Vikhe) हे मोठे नेते आहेत. मात्र आमच्याकडे केवळ शीट आणि खरा बॅलेन्स तर विखेंकडेच आहे...

पाच वर्षे विरोधी पक्षात राहिल्यानंतर ते भाजपात गेले. हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) यांच्या म्हणण्यानूसार विखेंनाही आता शांत झोप येत असले, या शब्दात पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनी चिमटे काढले आहेत.

दरम्यान, नगरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडण्याविषयी पक्षश्रेष्ठींना चर्चा केली आहे. मात्र अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींचा असेल, याचा पुनरूच्चार त्यांनी केला. जिल्हाधिकारी कार्यालयात करोना (covid19) आणि अतिवृष्टीच्या आढावा बैठकीनंतर पालकमंत्री मुश्रीफ माध्यमांशी बोलत होते. खा. डॉ. सुजय विखे यांनी पालकमंत्री बॅलेन्सशीट तपासण्यात व्यस्त असल्याची टीका केली होती. त्यावर उत्तर देतांना पालकमंत्री मुश्रीफ यांनी तिरकस वार केले.

मुश्रीफ पुढे म्हणाले, नगरप्रमाणे (ahmednagar) येणाऱ्या काळात कोल्हापूर (kolhapur) जिल्ह्यात विधान परिषद, जिल्हा बँका, नगर पालिका, नगर परिषद, बाजार समित्या आणि त्यानंतर लगेच जिल्हा परिषद निवडणूक होत आहे. मी नगरचा पालकमंत्री आणि कोल्हापूरचा संपर्क मंत्री असल्याने एकाच वेळी दोन ठिकाणी कसा वेळ देवू शकणार? यात विनाकारण ओढाताण होणार आहे. यामुळे पालकमंत्री पदाबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली. दरम्यान, नगरमध्ये बैठकीला शिर्डी संस्थांचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले पाटील आणि अधिकारी उपस्थित होते.

विधान परिषदेची निवडणूक ही महाविकास आघाडी म्हणूनच होणार असून अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ज्या ठिकाणी जमेल त्या ठिकाणी महाविकास आघाडी अन्यथा ज्या ठिकाणी आघाडी होणार नाही, त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर निर्णय होवून लढती होतील, असे पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

मोदी सरकारने (Modi Govt) पेट्रोल आणि डिझेलचे दर (petrol-disel rate) कमी न केल्याने त्यामुळे व्हॅटच्या स्वरूपात राज्य सरकारच्या तिजोरीतही पैसा पडत आहे. कोविडनंतर आता सर्वकाही खुले केल्यानंतर आता बर्यापैकी सरकारकडे महसूल जमा होत असून लवकरच विकास कामांसाठी निधी उपलब्ध होणार आहे. राज्यातील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लवकरच निधी उपलब्ध होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कर्डिलेंनी आडवाटेने यावे!

अकोले (akole) दौरा करत असतांना माजी आ. शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) हे पालकमंत्री सापडत नसल्याची टीका करत असल्याचे माझ्या वाचनात आले. मी अकोल्यात असतांना ते आडवाटने आले असते तर मी त्यांना सापडलो असतो. त्यावर पत्रकारांनी त्यांना आडवाटने विधान परिषदेची उमेदवारी देणार का? असा प्रश्न करताच मंत्री मुश्रीफ यांनी असे होणार नाही.

तसेच भाजपमधून राष्ट्रवादीत येवून विधान परिषदेसाठी कोणी तिकीट मागत असेल, तर मला याबाबत कल्पना नसल्याचा खुलासा केला. तसेच माझ्यावर टीका करणारे आ. बबनराव पाचपुते (Babanrao Pachpute) हे आमचे नेते असून पूर्वी आमच्या पक्षाचे अध्यक्ष होते. आता त्यांची तब्येत बरी नसून त्यांनी आधी तब्येतीकडे लक्ष द्यावे, असा सल्ला त्यांनी दिला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com