कोपरगावात राष्ट्रवादीचे आंदोलन

पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीचा निषेध
कोपरगावात राष्ट्रवादीचे आंदोलन

कोपरगाव (प्रतिनिधी) / Kopargaon - देशात पेट्रोल, डिझेल बरोबरच घरगुती गॅस इंधनाच्या दरवाढीचा (petrol, diesel and gas price hike) उच्चांक झालेला आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने नागरिकांना महागाईच्या खाईत लोटून सर्वसामान्य माणसाच्या घरातला गॅस सिलेंडरचा दर 25 रुपयांनी वाढवला आहे. केंद्र सरकार एकामागे एक महागाईचे धक्के देत असल्याच्या निषेधार्थ आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने (NCP) आंदोलन केले. इंधनाची दरवाढ मागे घ्यावी या मागणीचेे निवेदन नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे, देशातील नागरिक करोना महामारीचा सामना करत असताना नागरिकांना आधार द्यायचे सोडून केंद्र सरकार वारंवार महागाई मध्ये वाढ करून सर्वसामान्यांना चटके देत आहे. यात जनता होरपळून निघत आहे. कोणत्याही राज्यात निवडणुका लागल्या की इंधन दरवाढ नियंत्रित ठेवली जाते आणि निवडणुका संपल्या की दिलेली आश्‍वासने विसरून जायची असा केंद्र सरकारचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. इंधन दरवाढीचा सर्वात मोठा फटका सर्वसामान्य माणसाला बसतो. गेल्या दीड वर्षातल्या कोविड प्रादुर्भावाच्या कालखंडामध्ये अनेकांचे रोजगार गेले आहेत व ज्यांचे रोजगार आहेत त्यांच्या मिळकतीमध्ये कपात झाली आहे.

त्यामुळे आपला घरखर्च कसा चालवायचा? असा प्रश्‍न सर्वसामान्य जनतेला पडला असताना इंधनामुळे वाढत असलेली महागाई सर्वसामान्यांच्या मुळावर उठली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, शहराध्यक्ष सुनील गंगुले, युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, संकेत कडवे, रमेश गवळी, वाल्मिक लहिरे, अशोक आव्हाटे, दिनेश पवार, राजेंद्र जोशी, नारायण लांडगे, मुकुंद इंगळे, संदीप कपिले, राजेंद्र आभाळे, सागर लकारे, महेश उदावंत, विकास बेंद्रे, एकनाथ गंगुले, आकाश डागा, निखील डांगे, संदीप देवळालीकर, दीपक तिरमखे, संतोष दळवी, प्रकाश दुशिंग, विजय नागरे, बाळासाहेब रुईकर, ऋषीकेश खैरनार, अमनभाई मणियार, संतोष बारसे, तालिफ सय्यद आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com