नायगाव फाट्यावर रामपुरी चाकूचा धाक दाखवून रोख रकमेसह डंपर पळविला

पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल
नायगाव फाट्यावर रामपुरी चाकूचा धाक दाखवून रोख रकमेसह डंपर पळविला

श्रीरामपूर |प्रतिनिधी|Shrirampur

श्रीरामपूर-वैजापूर रोडवरील गोदावरी तीराजवळ नायगाव फाटा येथे डंपर थांबवून एका व्यक्तीने डंपर चालकास रामपुरी चाकू लावून त्याच्या खिशातील 5 हजार 100 तसेच डंपर असा एकूण 1 लाख 57 हजार 100 रुपयाचा ऐवज घेवून पसार झाला. याप्रकरणी एका जणाविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीरामपूर-वैजापूर रोडवरील गोदावरी तीराजवळ नायगाव फाटा येथे भगवान बापू पवार, रा. रामपूर, ता. श्रीरामपूर याने अकील अजीज शेख, धंदा-ड्रायव्हर, रा. आशीर्वादनगर, वॉर्ड नं. 1, श्रीरामपूर चालवत असलेला डंपर थांबवण्याचा इशारा केला. अकीलच्या डंपरचा वेग कमी होताच भगवान पवार याने रामपुरी चाकूचा धाक दाखवून अकील शेखच्या ताब्यातील 1 लाख 22 हजार रुपये किंमतीचा डंपर क्र. एमएच 17 एजी 3744 व 5,100 रुपये रोख रक्कम असा 1,27,100 रुपये किंमतीचा ऐवज घेऊन भरधाव वेगाने वैजापूरच्या दिशेने पसार झाला.

याप्रकरणी अकील शेख यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 93/2021 नुसार भगवान पवार याचेविरुध्द भादंवि कलम 392, 323, 504, 506 प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास श्रीरामपूर तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बोरसे हे करीत आहेत. हा गुन्हा वाळू तस्करीतून घडला असावा अशी चर्चा आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com