नवरात्रोत्सवात वढणे वस्ती देवी मंदिर बंदच

सर्व परंपरा मात्र जोपासल्या जाणार
नवरात्रोत्सवात वढणे वस्ती देवी मंदिर बंदच

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच मंदिरे अद्यापही बंद ठेवली आहेत. आता शासनाच्याच सुचनेनुसार

यंदाचा श्रीरामपूरकरांचे ग्रामदैवत असलेल्या वॉर्ड नं. 7 मधील वढणे वस्ती येथील देवी महाकालिका आणि काळूआई मंदिरातील नवरात्रोत्सव लोक सहभागाशिवाय करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वढणे कुटुंबियांनी दिली.

यावर्षी येत्या 17 ऑक्टोबर पासून प्रथेप्रमाणे वढणे वस्ती येथील देवी महाकालिका आणि काळूआई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. या नऊ दिवसांत मंदिरातील घटस्थापना, सप्तशती पाठ, होम-हवन, नित्य महापूजा, नित्य अभिषेक, विविध पूजा या सर्व परंपरा जोपासल्या जाणार आहेत. यावेळी मंदिरातील पुजारी, सोहळ्याचे मानकरी यांच्याशिवाय कोणालाही मंदिरात प्रवेश दिला जाणार नसल्याचेही सांगण्यात आले.

गाभार्‍यात व मंदिर परिसरात कोणालाही परवानगी नसेल. दर्शन सोहळ्यास पूर्ण बंदी आहे. श्रद्धा व शासकीय नियम याचा मेळ घालून उत्सव पार पाडण्यास भाविकांनी सहकार्य करावे. नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

करोनाला हरविण्यासाठी सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करायचं आहे. तोंडाला मास्क लावणं हे बंधनकारक आहे. इतर सणांप्रमाणेच नवरात्रोत्सवातही सर्वांनीच खबरदारी घ्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com