राजकारणातील एकमेकांचे कट्टर विरोधक आले एकत्र, अनेकांना बसला आश्चर्याचा धक्का

राजकारणातील एकमेकांचे कट्टर विरोधक आले एकत्र, अनेकांना बसला आश्चर्याचा धक्का

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Deolali Pravara

शेटेवाडी (Shetewadi) भागातील चार चारीवरील गणपती चौकात बाबामहाराज मोरे यांच्या अधिपत्याखाली सुरू असलेल्या नवनाथ पारायण सप्ताह (Navnath Parayan Saptah) सोहळ्याचे दीपवंदन नगराध्यक्ष सत्यजित कदम (Mayor Satyajit Kadam) व गणेश भांड (Ganesh Bhand) यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने राजकारणातील (Political) एकमेकांचे कट्टर विरोधक (Staunch opponents of each other) एकत्र आल्याचे बघायला मिळाले.

देवळाली प्रवरा नगरपरिषदेची निवडणूक (Election of Deolali Pravara Municipal Council) दोन, अडीच महिन्यांवर येऊन ठेपली असताना दोघांना एकत्र बघून उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला. यावेळी उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चोथे, गटनेते नगरसेवक सचिन ढुस, नगरसेवक आदिनाथ कराळे, तुषार शेटे, रामभाऊ हापसे आदी उपस्थित होते.

यावेळी सत्यजित कदम म्हणाले, आम्ही एकत्रच आहोत. याला उपस्थितांनी टाळ्या वाजून प्रतिसाद दिला. तर गणेश भांड यांनी कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त न करता फक्त स्मितहास्य केले. पारायणास महिला वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला. पारायण सप्ताह यशस्वीपणे पार पडण्यासाठी शिवमुद्रा ग्रुपच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

यावेळी सागर खांदे, नंदकुमार चोथे, जगन्नाथ वरखडे, बाबासाहेब कदम, अशोक कदम, बाबा शेटे, बाळासाहेब वरखडे, त्रिंबक मोरे, बापूराव जाधव, रंगनाथ कदम, देवराम शेटे, संतोष काळे आदींसह शिवमुद्रा ग्रुपचे सर्व सदस्य व भाविक उपस्थित होते. काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com