ऐन दीपावलीच्या पहाटे नाऊर येथील स्प्रिंकलर सेटची चोरी

नाऊर व परिसरात स्प्रिंकलर चोरटे पुन्हा सक्रिय
ऐन दीपावलीच्या पहाटे नाऊर येथील स्प्रिंकलर सेटची चोरी

नाऊर |वार्ताहर| Naur

श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील शेतकरी नारायण दामोदर देसाई यांचा गट.नं. 140 मध्ये शेतकरी केशव वामन देसाई यांनी नवीन विकत घेतलेल्या स्प्रिंकलरच्या 8 गणची अज्ञात चोरट्याने रात्रीच्या सुमारास चोरून नेला असून गेल्या काही महिन्यांपूर्वी गणेश शिंदे, धनंजय ढोबळे यांच्यासह नाऊरचे शेतकरी जमीन वैजापूर हद्दीत असलेले शगिर पटेल यांच्या शेतातील स्प्रिंकलर गणची चोरी झाली होती अद्याप त्या चोरांचा तपास लागला नसून पुन्हा नव्या सेटची चोरी झाल्याने स्प्रिंकलर चोरांची टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येते.

येथील शेतकरी नारायण दामोधर देसाई यांचे नाऊर गावालगत ग.नं. 140 मध्ये क्षेत्र असून ते बाहेर वास्तव्यास असल्याने त्यांची शेती लगतचे शेतकरी केशव वामन देसाई यांच्याकडे कसण्यासाठी असून त्यांनी स्व. मालकीचा दोनच दिवसांपूर्वी नवा स्प्रिंकलर सेट खरेदी केला होता. पिकांना पाणी द्यायचे म्हणून या शेतामध्ये सेट लावला होता. रात्री 11. च्या सुमारास शेतामध्ये लावलेले स्प्रिंकलरचे आठ गण व्यवस्थित होते.

मात्र पहाटेच्या सुमारास केशव देसाई यांचा मुलगा शेतात आला असता सदर गणची चोरी झाल्याचे त्याच्या लक्षात आल्याने यासंदर्भात तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळी स्वत: पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून बीट अंमलदार व पोलीस कर्मचारी यांना तपासाबाबत सूचना दिल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com