निसर्गाच्या सहवासात अन् पक्षी-प्राण्यांच्या साक्षीने भरली शाळा

गोपाळवाडीचे विद्यार्थी झाले मंत्रमुग्ध
निसर्गाच्या सहवासात अन् पक्षी-प्राण्यांच्या साक्षीने भरली शाळा

उंबरे |वार्ताहर| Umbare

बिनभिंतीच्या निसर्गाच्या (Nature) शाळेतील लाखो गुरूंच्या सहवासात राहुरी तालुक्यातील (Rahuri Taluka) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (Zilla Parishad Primary School) गोपाळवाडीचा (Gopalwadi) वर्ग भरला. विविध पक्ष्यांचे दर्शन घेत विद्यार्थी भारावून गेले.

निसर्गाच्या सहवासात अन् पक्षी-प्राण्यांच्या साक्षीने भरली शाळा
World Sparrow Day : चिऊताई हरवली कुठे ?

निमित्त होते अहमदनगर जिल्हा निसर्गप्रेमी संघटना (Ahmednagar District Nature Lovers Association) व जैवविविधता संशोधन व संवर्धन केंद्र (Biodiversity Research and Promotion Center) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पक्षीनिरीक्षण व पक्षीगणना उपक्रमाचे! चिमणी (Sparrow), कावळा (Crow), कबुतर (Pigeon) या नेहमी दिसणार्‍या पक्षांबरोबरच सकाळच्या वेळी पाणथळ किंवा विहिरीच्या (Well) परिसरात विद्यार्थ्यांना मैना, भारद्वाज, सातभाई, सुतार, कोकीळ, कोतवाल, बगळा यासारख्या काही पक्षांचेही दर्शन झाले. विहिरीत लटकणारे सुगरणीचे खोपे, गोल गोल फिरत अचानक सूर मारणारी टिटवी, रंगीबेरंगी खंड्या असे काही वेगळे पक्षी पाहून चिमुकले भारावून गेले. हिरवी झाडे, पिवळी शेते, पाण्याने भरलेल्या विहिरी, जनावरे आणि यांच्या सोबतीने बागडणारे, विहारणारे पक्षी, प्राणी पाहून चिमुकले हरखून गेले.

निसर्गाच्या सहवासात अन् पक्षी-प्राण्यांच्या साक्षीने भरली शाळा
जागतिक चिमणी दिन : या चिमण्यांनो परत फिरा रे..!

परिसर अभ्यास, आपल्या परिसराची माहिती, पर्यावरणाविषयी जाणीव जागृती आणि पर्यावरण संवर्धनात आपलाही सहभाग व्हावा, या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाच्या अनुषंगाने आधी विद्यार्थ्यांना विविध पक्षांची माहिती सांगण्यात आली. त्यानंतर आपल्या परिसरात दिसणार्‍या पक्षांकडे बघण्याचा चिमुकल्या विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन पूर्ण वेगळा होता. कोणता पक्षी आहे? त्यांची साधारण संख्या किती? हे मुलं निरीक्षणातून टिपत होते. हे सगळं पाहत असतानाच परिसरातील झाडे, वनस्पती, पिके यांची माहिती, पानांचे प्रकार, जनावरांचा चारा, पक्षांचा किलबिलाट, प्राण्यांचा आवाज याचाही कुतूहलाने आस्वाद घेत होते. नियमित पक्षांबरोबरच साळुंकी, सातभाई, खंड्या, मैना, पोपट, शिंपी, सुतार, रॉबिन, घुबड, कोतवाल, घार, बगळा, सुगरणीचा खोपा अशा अनेक नाविन्यपूर्ण पक्षी आणि त्यांच्या सवयी पाहून चिमुकले हरखून गेले.

प्राणी, पक्षी, त्यांचे आवाज यांचे निरीक्षण आणि श्रावण केले पाहिजे, त्यांचे संरक्षण आणि संवर्धन केले पाहिजे तरच आपल्या पर्यावरणाचे रक्षण शक्य आहे, असे शिक्षक नारायण मंगलारम म्हणाले. जयराम सातपुते यांच्या प्रेरणेतून राबविले जाणारे 2022 हे जिल्ह्यातील पक्षी गणनेचे तेरावे वर्ष आणि गोपाळवाडी शाळेतील तिसरे वर्ष आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com