बुधवारी पेट्रोल पंप चालकांचे देशव्यापी आंदोलन; पंप चालू असणार का?

एका दिवस खरेदी बंद आंदोलन : राज्यातील 6 हजार 500 पंप चालक सहभागी होणार
बुधवारी पेट्रोल पंप चालकांचे देशव्यापी आंदोलन; पंप चालू असणार का?

अहमदनगर (प्रतिनिधी)

केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी आणि सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी राज्यासह देशातील पेट्रोल पंप चालकांनी बुधवार (दि.31) रोजी पेट्रोल आणि डिझेलची खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे.

या आंदोलनात नगर जिल्ह्यातील 450 हून अधिक पेट्रोल पंप चालक सहभागी होणार असल्याची माहिती पेट्रोल पंप चालक संघटनेचे अध्यक्ष चारूदत्त पवार यांनी दिली. या आंदोलनात पंप चालक इंधन खरेदी करणार नसले तरी विक्री मात्र, सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारने 2017 पासून पेट्रोल आणि डिलर्सचे डिलर मार्जिन वाढलेले नाही. शासन व ऑईल कंपन्यांसोबत झालेल्या करारानूसार दहा सहा महिन्यांनी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देेशांकाशी निगडीत केले असतांनाही त्यांची अंमलबजावणी झालेली नाही. मात्र, दुसरीकडे 2017 पासून आतापर्यंत इंधनाच्या किंमती दुप्पट झालेल्या आहेत. यामुळे पंप चालकांना गुंतवणूक खर्च, बँकांचे व्याज, पगार, वीज बिल, बाष्पीभवन, विविध शासकीय कर आदी खर्च दुप्पट भरावा लागत आहे. त्यातच सरकारने दोन वेळा 4 नोव्हेंबर 2021 व 21 मे 2022 एक्साईज कपात जाहीर केली व इंधनाच्या किंमती सुमारे 8 ते 12 रुपयांनी कमी केल्या. त्याची अंमलबजावणी ताबडतोब करायला लावली.

वास्तवात डिलर्सनी जास्त दराने एक्साईज भरून माल खरेदी केला होता व तो माल विक्री करतांना त्याला कमी केलेल्या एक्साईज दराने विक्री करायला बंधनकारक केले. डिलर्सच्या नफ्यात नुकसान झाले तर समजू शकतो मात्र इथे तर त्याच्या मुद्दलामध्ये घट झाली. यामुळे संपूर्ण देशात सुमारे 3 हजार कोटींचे नुकसान झाले. यामुळे डिलर्स यांना नुकसानीमुळे नवीन माल खरेदी करणे कठीण झाले आहे.

पंप चालकांचा इंधनाचे दर कमी करण्यास पाठिंबा आहे. मात्र, शासनाने स्वत: 16 जून 2017 रोली सुरू केलेली डेली प्राईस चेंज पध्दत अचानक बदलून स्वत:ला व ऑईल कंपन्यांना सोयीच्या घोषणा करतांना डिलर्सचे नुकसान होणार नाही हे पाहिले पाहिज. कबूल केलेली डायनामिक प्रायसिंग कंपनीकडून पाळली जात नाही. त्यामुळे पूर्वीची 15 दिवसांची दर बदलण्याची पध्दत सुरू करावी अशी पंप चालक संघटनेची मागणी आहे.

ऑईल कंपन्या वरील व इतर समस्यांचे निराकरणांसाठी चर्चे तयार नाहीत. यासाठी 31 मे रोजी एक दिवस खरेदी बंद ठेवून शासन व ऑईल कंपन्यांचे लक्ष वेधून एकजुटीचे प्रदर्शन करण्यासाठी हे लाक्षणिक आंदोलन असून बुधवारी खरेदी बंद राहणार असली तरी विक्री सुरू राहणार असल्याचे फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष उदय लोध यांनी सांगितल.

दरम्यान भारत पेट्रोलियम कंपनीने गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या इंधन पुरवठा थांबविला असून त्यामुळे जनतेला इंधनाच्या पुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्यास त्याला डिलर्स नव्हे, तर कंपनी आणि केंद्र सरकार जबाबदार राहणार असल्याचे फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे म्हणणे आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com