हिवरगाव पावसा टोल नाका प्रशासनाविरुद्ध राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

हिवरगाव पावसा टोल नाका प्रशासनाविरुद्ध राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

संगमनेर (प्रतिनिधी)

पुणे- नाशिक महामार्गावरील हिवरगाव पावसा टोल नाका प्रशासनाने प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत झालेल्या मागण्यांवर अंमलबजावणी केली नाही. उलट शेतकरी, व्यापारी यांच्याकडून बेकायदा टोल वसुली करणे सुरुच ठेवले आहे. टोल नाका प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने बुधवार दि. 8 सप्टेंबर रोजी टोल प्रशासनाविरुद्ध आंदोलन करण्यात येणार आहे.

पुणे-नाशिक महामार्गावर असलेल्या हिवरगाव पावसा टोल नाका अंतर्गत रस्त्यांचे खड्डे बुजणार, स्ट्रीट लाईट चालू करणार, रस्त्यांच्या मधोमध वाढलेली झाडी काढणार, बेकायदा टोल वसुली थांबविणार, स्थानिकांचे परस्पर कट होणारे पैसे बंद होणार या मागण्यांवर प्रामुख्याने चर्चा झाली. सदर मागण्या 15 दिवसांत पूर्ण करण्याचे आश्‍वासन टोल नाका प्रशासनाकडून देण्यात आले होते. मात्र 15 दिवसा यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही. उलट बेकायदा टोल वसुली सुरुच आहे.

टोलनाका प्रशासनाने हुकुमशाही पद्धतीने सुरु ठेवलेली टोल वसुली बंद व्हावी, रस्त्यांची सुधारणा व्हावी, यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आंदोलनाचा पावित्र्य हाती घेतला आहे. याबाबतचे निवेदन प्रांतााधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी यांना देण्यात आले आहे. निवेदनावर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, शहराध्यक्ष प्रशांत वामन, महिला अध्यक्षा वैशाली राऊत, अक्षय भालेराव, राहुल वर्पे, अमोल राऊत, केवल आव्हाड आदिंच्या सह्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com