स्वबळावर राष्ट्रवादीचा झेंडा पालिकेवर फडकवावा

राष्ट्रवादीच्या श्रीरामपुरातील मेळाव्यात आ. निलेश लंके यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
स्वबळावर राष्ट्रवादीचा झेंडा पालिकेवर फडकवावा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) हा शिस्तीचा, विचारांचा पक्ष आहे, संघटनेत काम करताना सामान्य जनतेचे सुख दु:ख, अडी-अडचणी जाणून घेतल्या पाहिजेत, कार्यकर्त्यांना विश्वास दिला पाहिजे, पदाधिकार्‍यांनी आपल्या कामातून पदाचे महत्त्व वाढेल, असे काम केले पाहिजे, आगामी निवडणुकीत (Election) याप्रमाणे काम करून नगरपालिकेवर (Municipalities) स्वबळावर पक्षाचा झेंडा फडकवावा, असे आवाहन पारनेरचे आ. निलेश लंके (Parner MLA Nilesh Lanke) यांनी केले.

काँग्रेेस भवन (Congress Building) येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा (Nationalist Congress Party) व पक्ष प्रवेश सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे अध्यक्षस्थानी होते. नगराध्यक्षा अनुराधा आदिक, तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, शहराध्यक्ष लकी सेठी, महिला अध्यक्षा अर्चना पानसरे, राहुरी तालुकाध्यक्ष सुरेश निमसे, नगरसेवक राजेंद्र पवार, प्रकाश ढोकणे, मुक्तार शहा, नगरसेविका प्रणीती चव्हाण, अल्तमश पटेल, दीपक चव्हाण व्यासपिठावर होते.

आ. लंके (MLA Nilesh Lanke) म्हणाले, स्व. बॅ. रामराव आदिक, स्व. गोविंदराव आदिक यांनी निःस्वार्थी, भ्रष्टाचारमुक्त राजकारण केले. त्यांच्या माध्यमातून शहर व तालुक्यात महत्त्वाची कामे, योजना झाल्या. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून नगराध्यक्षा अनुराधा आदिक (Mayor Anuradha Adik) काम करीत आहेत. त्यांचे हात बळकट करण्याची आपली जबाबदारी आहे. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेवर आला पाहिजे, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. नगराध्यक्षा आदिक (Mayor Anuradha Adik) यांनी विविध प्रश्न सोडविण्याची आपल्यावर जबाबदारी टाकली आहे. ते सोडविण्यासाठी शासन दरबारी निश्चित प्रयत्न करू.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक (Avinash Adik) यांना विधान परिषदेवर घेण्याससाठी आपण पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे प्रयत्न करावेत, अशी मागणी पदाधिकार्‍यांनी केली. त्यावर आ. लंके (MLA Nilesh Lanke) म्हणाले, आदिक कुटुंबावर पवार यांचा मोठा विश्वास आहे. त्यांच्याकडे मागण्याची गरज नाही. ते स्वत:हून देतात. जेथे अडचणी आहेत, दुहीची परिस्थिती आहे तेथे अविनाश आदिक (Avinash Adik) यांना पाठविले जाते. त्यांच्याकडे मोठी जबाबदारी असून त्यांच्या पश्चात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्ष बळकटीसाठी योगदान द्यावे.

नगराध्यक्षा आदिक (Mayor Anuradha Adik) म्हणाल्या, आ. लंके (MLA Nilesh Lanke) तडफदार आमदार आहेत. कामातून त्यांनी आपले ओळख निर्माण केली आहे. गेल्या निवडणुकीवेळी अनेकजण आपल्यासोबत होते. त्यांना पुरेसा वेळ देता आला नाही, त्यामुळे ते दूर गेले. आ. लंके (MLA Nilesh Lanke) यांनी त्यांना कानमंत्र द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

नगरसेवक राजेंद्र पवार यांनी शहर विकासाचा आढावा सादर केला. आघाडी सरकारात बरोबर असताना लोकप्रतिनिधी दुजाभाव करीत असल्याची तक्रार त्यांनी केली. सुरेश निमसे यांनी मनोगत व्यक्त केले. लकी सोठी यांनी स्वागत केले. कैलास बोर्डे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी भाऊसाहेब डोळस, सोमनाथ गांगड, सचिन पवार, पुष्पाताई कवडे, सुनील थोरात, सोहेल दारूवाला, जयाताई जगताप, हर्षल दांगट, गोपाल वायंदेशकर, रोनित घोरपडे, सोहेल शेख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com