‘नॅशनल पोस्टल’च्या कर्जावरील व्याजात एक टक्के कपात

संतोष यादव : सोसायटीची अल्पावधीत स्व भांडवलाकडे वाटचाल
‘नॅशनल पोस्टल’च्या कर्जावरील 
व्याजात एक टक्के कपात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

डिस्ट्रिक्ट नॅशनल पोस्टल क्रेडिट सोसायटीची (District National Postal Credit Society) स्थापना एप्रिल 2016 मध्ये झाली. या संस्थेने सभासदांना कमीत कमी दराने कर्ज (loan) उपलब्ध दिले. या संस्थेची वेगाने प्रगती असून संचालक मंडळ सभासदाच्या हितास अधिकाधिक प्राधान्य देत असून अल्पावधीतच संस्थेची स्व भांडवलाकडे वाटचाल सुरू ज्येष्ठ सभासद संतोष यादव यांनी संचालक मंडळाचे अभिनंदन केले आहे.

संस्थेची सहावी वार्षिक सर्वसाधारण (meeting) सभा नुकतीच ऑनलाइन (Online) पध्दतीने झाली. अध्यक्षपदी चेअरमन शिवाजी जावळे होते. संस्थेचे कार्यकारी संचालक सचिन गायकवाड यांनी संस्थेचे आर्थिक स्थिती सभेत सादर केली आणि सभासदाने ते टाळ्यांचा गजरात मंजूर केली. यावेळी यादव यांनी संस्थेचे आर्थिक पत्रके सभासदासमोर मांडून त्याविषयी सविस्तरपणे मार्गदर्शन केले. संस्था नवीन असूनही अल्पावधीच स्व भांडवलाकडे (Capital) वाटचाल करत आहे. सद्यस्थितीत उपलब्ध निधीमधून सभासदास कमीत कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून देत आहे.

चेअरमन जावळे यांनी संस्थेच्या कर्जावरील व्याजदरामध्य (Loan Intrest) 1 टक्के कपात, संस्थेची मासिक वर्गणी एक हजारवरून एक हजार 500 करण्याची विनंती करत सहकार आयुक्त पुणे यांच्या परिपत्रकानूसार पगारदार कर्मचारी सहकारी पतसंस्थाना द्यावयाच्या कर्जमर्यादा वाढीबाबत निर्णय घेण्याचे जाहीर केले. त्याचप्रमाणे सभेस ऑनलाइन(Online) उपस्थित सभासदास उपस्थिती भत्ता देण्याचे जाहीर केले. यावेळी व्हाईस चेअरमन नामदेव डेंगळे, संचालक प्रकाश कदम, राधाकिसन मोटे, प्रदिप सूर्यवंशी, संजय बोदरडे, रावसाहेब चौधरी, जे. पी. गटणे, एच. आर. मगर यांच्या संस्थेचे व्यवस्थापक दंडवते, चौधरी उपस्थित होते. सूत्रसंचालन बापू तांबे तर आभार डेंगळे यांनी मानले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com